Posts

घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

अंबड-घनसावंगी रोडवर उसाच्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकून भीषण अपघात

Image
  अंबड-घनसावंगी रोडवर उसाच्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकून भीषण अपघात वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    अंबड ते घनसावंगी मार्गावरील मोहापुरी गावाजवळ रविवारी रात्री १०:३० वाजता एक भीषण अपघात झाला. घनसावंगीहून अंबड कडे जात असताना उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून एका दुचाकीने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.   या अपघातत दुचाकी क्रमांक mh २० ep ६८६३ वरील दोघे जण अंबड कडे जात होते यावेळी मोहपुरी फाट्याच्या पुढे गेल्यानंतर दुचाकी उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून घडकली यात दोघनाही मार लागल्यामुळे दोघेही बेशुद्ध होऊन रोडवर पडले होते. अपघातानंतर तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळी उपस्थित लक्ष्मण पवार, नारायण तारगे, बापूराव पवार आणि सुशील देशमुख यांनी तत्काळ जखमींना रुग्णवाहिकेतून घनसावंगी उपजिल्हा रुग्णालयात हलवले. यातील एका जखमींच्या खिशाततील आधार कार्ड वर प्रविन रामू गायकवाड नवजीवन कॉलनी हडको छत्रपती संभाजी नगर असा पत्ता आहे.   अपघाताची माहिती मिळताच psi काळे यांनी दाखल घेत घनसावंगी पोलीस तिकांडे यांच्या सह सहकारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू केला आहे

महाराष्ट्रातील खाते वाटप जाहीर

Image
  महाराष्ट्रातील खाते वाटप जाहीर  कॅबिनेट मंत्री 1.चंद्रशेखर बावनकुळे - महसूल 2.राधाकृष्ण विखे पाटील - जलसंधारण                                    ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास) 3.हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण 4.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री 5.गिरीश महाजन - जलसंधारण  (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन 6.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा 7.गणेश नाईक - वन 8.दादाजी भुसे - शालेय शिक्षण 9.संजय राठोड - माती व पाणी परीक्षण 10.धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण 11.मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग                                व संशोधन 12.उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा 13.जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल 14.पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन 15.अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय,             ...

कोणाशीच नव्हते वांदे असे पत्रकार तुकाराम शिंदे !

Image
  कोणाशीच नव्हते वांदे  असे पत्रकार तुकाराम शिंदे ! पत्रकार तुकाराम शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील पत्रकार आणि मत्स्योदरी विद्यालयाचे शिक्षक तुकाराम नाथाजी शिंदे (वय 47) यांचे शनिवार, पहाटे 1:30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या तब्येतीची समस्या गेल्या वर्षभरापासून सुरू होती. त्यांच्या निधनाने घनसावंगी तालुक्यासह अंबड आणि परिसरात शोककळा पसरली आहे. समाजात माणुसकीचे नाते जपणारे पत्रकार..   तुकाराम शिंदे यांचा मनमिळाऊ स्वभाव, वाणीत गोडवा, आणि सतत हसते-खेळते व्यक्तिमत्त्व यामुळे ते परिसरात अत्यंत प्रिय होते. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांशी त्यांनी आपुलकीचे आणि माणुसकीचे नाते जपले होते. त्यांच्या निधनाने कुटुंब, मित्रपरिवार आणि पत्रकार जगत शोकसागरात बुडाले आहे.  पत्रकारितेतील योगदान..    शिंदे यांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत शेतीविषयक चांगले लिखाण केले होते. प्रगतशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा त्यांनी आपल्या लिखाणातून समोर आणल्या. त्यांच्या लिखा...

बीडमधील दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाई तर परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी – मुख्यमंत्री फडणवीस

Image
  बीडमधील दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाई तर परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी – मुख्यमंत्री फडणवीस  बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली   परभणी पोलीस अधिकारी निलंबित वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    बीड व परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाईल. तर परभणी मधील संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 20 डिसेंबर रोजी विधानसभेत दिली.    बीड, परभणी घटनांमधील दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यानुसार बीड मध्ये हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख आणि परभणी मधील घटनाक्रमात मृत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ही दहा लाखांची मदत देण्यात येणार आहे.    बीड मधील प्रकरणाची न्यायालयीन व एसआयटी मार्फत चौकशी करण्याबरोबर जिल्हा पोलीस अधिक्षकांची बदली करण्यात येईल. या प्रकरणातील दोषीं...

जालन्यात वीस हजाराची लाच घेतांना तलाठ्याला रंगेहात पकडले

Image
  जालन्यात वीस हजाराची  लाच घेतांना तलाठ्याला  रंगेहात पकडले  वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    तहसीलदार व पेशाकार यांना फेर दुरुस्तीसाठी पैसे लागतात म्हणून २०,००० रुपयाची लाच मागणाऱ्या तलाठ्यास जालन्यात आज १९.१२.२०२४ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.  तक्रारदार यांचे फेर दुरुस्तीबाबत आदेश काढुन देण्यासाठी तहसीलदार, जालना व पेशकार शिंदे यांचे करीता २०,००० रुपये लाचेची मागणी करुन २०,००० रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना मौजे इंदेवाडी सजाचे तलाठी शिवदास प्रेमसिंग पवार यांना अॅन्टी करप्शन ब्युरो, जालनाचे पथकाने रंगेहाथ पकडले.   तकारदार यांनी इसार पावतीव्दारे घेतलेल्या जमीनीची त्यांना खरेदी करणे असल्याने खरेदीसाठी फेर दुरुस्ती करणे आवश्यक आहे, त्याकरीता तकारदार तलाठी शिवदास पवार यांना भेटले असता त्यांनी फेर दुरुस्ती करणेसाठी तहसीलदार जालना यांचा कलम १५५ महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ नुसार आदेश काढावा लागेल, त्यासाठी तहसीलदार मॅडम आणि पेशकार शिंदे यांना २०,००० रुपये दयावे लागतील, असे म्हणुन तकारदार यांचेकडे २०,००० रुपये लाचेची मागणी केली,...

हिकमत उढाण आमदार व्हावेत म्हणून महाराजांचा अनोखा संकल्प पूर्ण

Image
  हिकमत उढाण आमदार  व्हावेत म्हणून महाराजांचा  अनोखा संकल्प पूर्ण  राधाकिसन महाराज गोरे यांचा अनोखा संकल्प पूर्ण, आमदार हिकमत उढाण यांच्या विजयाच्या निमित्ताने स्वीकारली चप्पल वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    घनसावंगी मतदारसंघाचे  एकनाथ शिंदे गटाचे नवनिर्वाचित शिवसेना आमदार मा. हिकमत उढान यांनी भाटेपुरी येथील आपल्या लाडक्या कार्यकर्त्यांचा सन्मान मोठ्या उत्साहात केला. ह.भ.प. राधाकिसन महाराज गोरे, रा. भाटेपुरी, ता. जि. जालना यांचा सत्कार करीत, खास त्यांच्या साठी आणलेली चप्पल शेकडो लोकांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक त्यांच्या स्वाधीन केली.   भाटेपुरी येथील हभप राधाकिसन रामनाथ गोरे महाराज यांनी 2014 साली केलेला अनवाणी पायांनी फिरण्याचा संकल्प अखेर 2024 मध्ये पूर्ण झाला आहे. हा संकल्प त्यांनी घनसांगी मतदारसंघातून हिकमत उढाण यांच्या विजयानंतर सोडला आहे. महाराजांनी संकल्प केला होता की, हिकमत दादा आमदार झाल्याशिवाय ते चप्पल घालणार नाहीत.   राधाकिसन महाराज यांनी सांगितले की, "2014 मध्ये डॉ हिकमत उढाण यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि प्रथमच घनसांगीच्या र...

स्कूलबसला आग लागून बस जळून खाक; ३५ विद्यार्थी बचावले!

Image
  स्कूलबसला आग लागून बस  जळून खाक; ३५ विद्यार्थी  बचावले! वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका स्कूलबसला अचानक आग लागून यात बस जळून खाक झालीय तर सुदैवाने यातील ३५ विद्यार्थी खाली उतरविण्यात आल्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एकदा ऐरणीवर आला आहे. सदरील घटना सिल्लोड तालुक्यातील आमठाणा गावाजवळ आज दि १८ डिसेंबर बुधवार रोजी घडलीय.    भराडी येथील एका विद्यालयात शिकणाऱ्या चौथी ते सातविच्या विद्यार्थ्यांना परिसरातील गावांतून आमठाणा गावाजवळ अचानक स्कूलबसमधून धूर येऊ लागला. ही बाब लक्षात येताच चालक व बसमधील दोन शिक्षिकांनी सर्व विद्यार्थ्यांना बसमधून खाली उतरवले. अचानक या बसने पेट घेतला व काही वेळातच बस पूर्णतः खाक झाली.     बसला आग लागल्याचे कळताच यातील ३५ विद्यार्थ्यांना बसबाहेर काढण्यात आले त्यामुळे कोणालाही इजा झाली नाही. त्यानंतर लगेचच बसने मोठा पेट घेतला. आग विझविण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी शेतातील विहिरीतून पाइपद्वारे पाणी मारले मात्र ...

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या