घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका स्कूलबसला अचानक आग लागून यात बस जळून खाक झालीय तर सुदैवाने यातील ३५ विद्यार्थी खाली उतरविण्यात आल्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एकदा ऐरणीवर आला आहे. सदरील घटना सिल्लोड तालुक्यातील आमठाणा गावाजवळ आज दि १८ डिसेंबर बुधवार रोजी घडलीय.
भराडी येथील एका विद्यालयात शिकणाऱ्या चौथी ते सातविच्या विद्यार्थ्यांना परिसरातील गावांतून आमठाणा गावाजवळ अचानक स्कूलबसमधून धूर येऊ लागला. ही बाब लक्षात येताच चालक व बसमधील दोन शिक्षिकांनी सर्व विद्यार्थ्यांना बसमधून खाली उतरवले. अचानक या बसने पेट घेतला व काही वेळातच बस पूर्णतः खाक झाली.
बसला आग लागल्याचे कळताच यातील ३५ विद्यार्थ्यांना बसबाहेर काढण्यात आले त्यामुळे कोणालाही इजा झाली नाही. त्यानंतर लगेचच बसने मोठा पेट घेतला. आग विझविण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी शेतातील विहिरीतून पाइपद्वारे पाणी मारले मात्र तोपर्यंत बस खाक झाली. विद्यार्थ्यांच्या स्कूलबॅग, टिफिन आगीत जळाले आहेत. त्यानंतर दुसरी बस मागवून सर्व विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यात आले.
या घटनेमुळे चिंतित झालेल्या पालकांनी शाळा गाठून संस्थाचालक, शिक्षक आणि स्कूल बसचालक, मालकाला यांच्या बद्दल संताप व्यक्त केला. बसमधील वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची माहिती घटनास्थली मिळाली.
दरम्यान या घटनेमुळे सुदैवाने जरी जीवित हानी वा कुनालाहि इजा झाली नसली तरी या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Comments
Post a Comment