घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील पत्रकार आणि मत्स्योदरी विद्यालयाचे शिक्षक तुकाराम नाथाजी शिंदे (वय 47) यांचे शनिवार, पहाटे 1:30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या तब्येतीची समस्या गेल्या वर्षभरापासून सुरू होती. त्यांच्या निधनाने घनसावंगी तालुक्यासह अंबड आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
समाजात माणुसकीचे नाते जपणारे पत्रकार..
तुकाराम शिंदे यांचा मनमिळाऊ स्वभाव, वाणीत गोडवा, आणि सतत हसते-खेळते व्यक्तिमत्त्व यामुळे ते परिसरात अत्यंत प्रिय होते. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांशी त्यांनी आपुलकीचे आणि माणुसकीचे नाते जपले होते. त्यांच्या निधनाने कुटुंब, मित्रपरिवार आणि पत्रकार जगत शोकसागरात बुडाले आहे.
पत्रकारितेतील योगदान..
शिंदे यांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत शेतीविषयक चांगले लिखाण केले होते. प्रगतशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा त्यांनी आपल्या लिखाणातून समोर आणल्या. त्यांच्या लिखाणाची सर्वत्र प्रशंसा झाली होती. त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत, त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
परिवाराच्या अथक प्रयत्नांना अपयश..
शिंदे यांची तब्येत गेल्या वर्षभरापासून खराब होती. त्याना मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, जालना येथील विविध दवाखान्यात उपचारासाठी दाखवण्यात आले होते. शिंदे यांची आई, पत्नी, भाऊ, आणि मुलगा यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली होती, मात्र त्यांच्या अथक प्रयत्नांना अपयश आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
2024 चा शेवटचा जन्मदिन..
1 ऑगस्ट 2024 रोजी साजरा केलेला तुकाराम शिंदे यांचा जन्मदिन त्यांच्या आयुष्यातील शेवटचा ठरला. त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांचा वाढदिवस साजरा केला होता, ज्यावेळी त्यांनी सर्वांशी हसत-खेळत साजरा केला..
कुठल्याही गावी नातेवाईक असले कि भेट घेणारच..
शिंदे यांनी आपल्या जीवनात जिथे कुठल्या गावी काही कामा निमित्त जायचे झाले तर आपले नातेवाईक जर तिथे त्या गावी असले तर काही वेळ का होईना त्यांना शिंदे बघेटू यायचे.
अशा परम मित्र तुकाराम शिंदे यास वास्तव न्युज परिवारा कडून व सर्व मित्र, नातेवाईक यांच्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपुर्ण श्रद्धांजली सर 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली नाना 💐😞
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली सर 🙏
ReplyDeleteभावपुर्ण श्रध्दांजली सर 🙏🙏
ReplyDelete