घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण
तहसीलदार व पेशाकार यांना फेर दुरुस्तीसाठी पैसे लागतात म्हणून २०,००० रुपयाची लाच मागणाऱ्या तलाठ्यास जालन्यात आज १९.१२.२०२४ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
तक्रारदार यांचे फेर दुरुस्तीबाबत आदेश काढुन देण्यासाठी तहसीलदार, जालना व पेशकार शिंदे यांचे करीता २०,००० रुपये लाचेची मागणी करुन २०,००० रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना मौजे इंदेवाडी सजाचे तलाठी शिवदास प्रेमसिंग पवार यांना अॅन्टी करप्शन ब्युरो, जालनाचे पथकाने रंगेहाथ पकडले.
तकारदार यांनी इसार पावतीव्दारे घेतलेल्या जमीनीची त्यांना खरेदी करणे असल्याने खरेदीसाठी फेर दुरुस्ती करणे आवश्यक आहे, त्याकरीता तकारदार तलाठी शिवदास पवार यांना भेटले असता त्यांनी फेर दुरुस्ती करणेसाठी तहसीलदार जालना यांचा कलम १५५ महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ नुसार आदेश काढावा लागेल, त्यासाठी तहसीलदार मॅडम आणि पेशकार शिंदे यांना २०,००० रुपये दयावे लागतील, असे म्हणुन तकारदार यांचेकडे २०,००० रुपये लाचेची मागणी केली, परंतु तकारदार यांची त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, जालना यांचेकडे तकार केली.
सदर तकारीवरुन दिनांक १८.१२.२०२४ रोजी तकारदार व आलोसे यांचे लाच मागणीबाबत पडताळणी केली असता तकारदार यांचे फेर दुरुस्ती करणेसाठी तहसीलदार जालना यांचा कलम १५५ महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ नुसार आदेश काढावा लागेल, त्यासाठी तहसीलदार मॅडम आणि पेशकार शिंदे यांना २०,००० रुपये दयावे लागतील, असे म्हणुन आलोसे याने तकारदार यांचेकडे तहसीलदार मॅडम आणि पेशकार शिंदे यांचेकरीता पंचासमक्ष २०,००० रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पण्ण झाले.
त्यावरुन आज दि. १९.१२.२०२४ रोजी सापळा लावला असता तकारदार यांचे फेर दुरुस्ती करणेसाठी कलम १५५ महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ नुसार आदेश काढण्यासाठी तहसीलदार मॅडम आणि पेशकार शिंदे यांचे करीता आलोसे यांनी तकारदार यांचेकडुन पंचासमक्ष २०,००० रुपये लाचेची रक्कम स्विकारली असता त्यांना त्यांचे खासगी कार्यालय, सोरटीनगर अंबड चौफुलीजवळ जालना जि. जालना येथे लाचेच्या रक्कमेसह अॅन्टी करप्शन ब्युरो, जालनाचे पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
नामे शिवदास प्रेमसिंग पवार, वय ४६ वर्ष पद तलाठी मौजे इंदेवाडी सजा, ता.जि. जालना, तहसील कार्यालय, जालना जि. जालना रा. सोरटीनगर अंबड चौफुली जालना जि. जालना (वर्ग ३) यांचेविरुध्द पोलीस ठाणे तालुका जालना जि. जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकीया सुरु आहे.स
सदरची कामगीरी संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, छत्रपती संभाजीनगर, मुंकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, छत्रपती संभाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली बी. एस. जाधवर, पोलीस उप अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, जालना यांनी व पथकातील अंमलदार गजानन घायवट, गणेश चेके, गणेश बुजाडे, कुष्णा देठे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment