घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण
अंबड ते घनसावंगी मार्गावरील मोहापुरी गावाजवळ रविवारी रात्री १०:३० वाजता एक भीषण अपघात झाला. घनसावंगीहून अंबड कडे जात असताना उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून एका दुचाकीने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.
या अपघातत दुचाकी क्रमांक mh २० ep ६८६३ वरील दोघे जण अंबड कडे जात होते यावेळी मोहपुरी फाट्याच्या पुढे गेल्यानंतर दुचाकी उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून घडकली यात दोघनाही मार लागल्यामुळे दोघेही बेशुद्ध होऊन रोडवर पडले होते. अपघातानंतर तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळी उपस्थित लक्ष्मण पवार, नारायण तारगे, बापूराव पवार आणि सुशील देशमुख यांनी तत्काळ जखमींना रुग्णवाहिकेतून घनसावंगी उपजिल्हा रुग्णालयात हलवले. यातील एका जखमींच्या खिशाततील आधार कार्ड वर प्रविन रामू गायकवाड नवजीवन कॉलनी हडको छत्रपती संभाजी नगर असा पत्ता आहे.
अपघाताची माहिती मिळताच psi काळे यांनी दाखल घेत घनसावंगी पोलीस तिकांडे यांच्या सह सहकारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू केला आहे
Comments
Post a Comment