घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
घनसावंगी मतदारसंघाचे एकनाथ शिंदे गटाचे नवनिर्वाचित शिवसेना आमदार मा. हिकमत उढान यांनी भाटेपुरी येथील आपल्या लाडक्या कार्यकर्त्यांचा सन्मान मोठ्या उत्साहात केला. ह.भ.प. राधाकिसन महाराज गोरे, रा. भाटेपुरी, ता. जि. जालना यांचा सत्कार करीत, खास त्यांच्या साठी आणलेली चप्पल शेकडो लोकांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक त्यांच्या स्वाधीन केली.
भाटेपुरी येथील हभप राधाकिसन रामनाथ गोरे महाराज यांनी 2014 साली केलेला अनवाणी पायांनी फिरण्याचा संकल्प अखेर 2024 मध्ये पूर्ण झाला आहे. हा संकल्प त्यांनी घनसांगी मतदारसंघातून हिकमत उढाण यांच्या विजयानंतर सोडला आहे. महाराजांनी संकल्प केला होता की, हिकमत दादा आमदार झाल्याशिवाय ते चप्पल घालणार नाहीत.
राधाकिसन महाराज यांनी सांगितले की, "2014 मध्ये डॉ हिकमत उढाण यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि प्रथमच घनसांगीच्या राजकारणात नवा धडाका आणला. त्या वेळी ते तिसऱ्या स्थानावर राहिले होते, परंतु त्यांनी हार मानली नाही. काही अफवा उठल्या की दादा मुंबईला जातील, परंतु त्यांनी घनसांगीतच कार्यालय उभारून तें शिव सैनिकांसाठी अर्पण करून आपली जिद्द दाखवली. 2019 च्या विधानसभेतही ते पराभूत झाले, परंतु त्यांनी धैर्य सोडले नाही. अखेर 2024 मध्ये त्यांनी विजय मिळवला, आणि म्हणून मी 2014 पासून केलेला संकल्प सोडला आहे
कार्यक्रमात अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थ, व उपस्थितांनी आमदार हिकमत दादा यांच्या या आदरभावनेचे कौतुक केले. ह.भ.प. राधाकिसन महाराज गोरे यांनीही या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व आमदार उढान यांचे आभार मानले. हा कार्यक्रम स्थानिक पातळीवर मोठा चर्चेचा विषय ठरला असून, आमदार उढान यांचे कार्यकर्त्यांप्रती असलेले प्रेम व निष्ठा याचा यानिमित्ताने पुनःप्रत्यय आला.
आमदार हिकमत उढाण यांनी घनसांगीतून आज दी 19 डिसेंबर रोजी चप्पल आणून राधाकिसन महाराज यांना अर्पण केली, आणि ती महाराजांनी आनंदाने स्वीकारली. या अनोख्या संकल्पपूर्तीनंतर घनसांगीत आनंदाचे वातावरण आहे. महाराजांच्या या कृतीमुळे त्यांच्या समर्पणाची आणि दृढतेची चर्चा सर्वत्र होत आहे.
Comments
Post a Comment