घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

 व्यसनाचा भीषण शेवट- कुटुंबातिल तिघांचा झाला दुर्दैवी अंत..


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   एक अत्यंत दुर्दैवी व अंगाला शहारे आणणारी हृदयद्रावक घटना समोर आलीय ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट झाला असून कर्जबाजारीपणामुळे तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही आत्महत्या करत कुटुंबाचा अंत केला.

     धाराशिव जिल्ह्यातील बावी (ता. कळंब) या गावात ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या लक्ष्मण जाधव या तरुण ट्रॅक्टर चालकाने आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात आहे.


आर्थिक अडचणीतून दुर्दैवी पाऊल

   मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण जाधव (वय अंदाजे ३०) हा गावातील कष्टकरी ट्रॅक्टर चालक होता. काही महिन्यांपासून त्याला ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमचं अतिशय व्यसन जडलं होतं. सुरूवातीला कमी रकमेने खेळत असताना काहीवेळा जिंकल्यामुळे त्याला त्या गेमची सवय लागली. मात्र, नंतर त्याने मोठ्या प्रमाणावर पैसे गमावले.

   वाढते नुकसान भरून काढण्यासाठी त्याने कर्ज घेण्यास सुरुवात केली. कुटुंब चालवण्यासाठी आणि ऑनलाइन गेममध्ये पैसे टाकण्यासाठी त्याने ओळखीच्या लोकांकडूनही कर्ज घेतले. मात्र, नुकसानच होऊ लागल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि त्यातून तो मानसिक तणावात गेला.

पतीने घेतला टोकाचा निर्णय

    शनिवार रात्री किंवा रविवारी पहाटेच्या सुमारास लक्ष्मणने आधी पत्नी आणि लहान मुलाचा गळा घोटून खून केला असावा आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीवन संपवल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोमवारी सकाळी ही दुर्दैवी घटना उघड झाली, तेव्हा घरात तिघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेने गावात प्रचंड खळबळ उडाली आहे.

गावकऱ्यांचे दुःख – ऑनलाइन व्यसनाने बळी घेतला

    गावकऱ्यांनी सांगितले की, लक्ष्मण मेहनती आणि मनमिळावू स्वभावाचा होता. मात्र काही काळापासून तो सतत मोबाईलमध्ये गुंतलेला दिसत होता. नंतर कळले की तो 'ऑनलाइन रम्मी' नावाच्या गेममध्ये पैसे लावून खेळत होता. कर्जबाजारी झाल्यानंतरही त्याने व्यसन सोडलं नाही आणि अखेर अशा भीषण टोकाला पोहोचला.

एक धोक्याचा इशारा – ऑनलाइन जुगाराच्या विळख्यातून बाहेर या!

    आज या घटनेनंतर सोशल मीडियावरून आणि गावकऱ्यांच्या वतीने एक कळकळीची विनंती केली जात आहे मित्रांनो, सुखाची अन् कष्टाची भाकर आयुष्यभर पुरते, पण जुगार, सट्टा, मटका, गुटखा हे सर्व तुमच्या आयुष्याचा शेवट करू शकतात. ऑनलाइन गेमच्या नादी लागू नका. नशा आणि व्यसनाचा शेवट नेहमीच अश्रू देतो.

पोलिस तपास सुरू

    घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, घटनेचा सखोल तपास सुरू आहे. आत्महत्येचे नेमके कारण व कर्जाची रक्कम किती होती याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

   समाजाच्या पुढे एक मोठा सवाल उभा राहतो – मोबाईल आणि इंटरनेटच्या अति वापराने, विशेषतः ऑनलाइन जुगाराच्या विळख्यात सापडलेल्यांना वेळेत जागृत करणं गरजेचं आहे. अन्यथा अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments

  1. याबाबतीत सरकार आशा खेळावर बदी आणनार आहे का?

    ReplyDelete
  2. मुलांनी कुटुंबाचा विचार करावा सुरुवातीला

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या