घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
धाराशिव जिल्ह्यातील बावी (ता. कळंब) या गावात ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या लक्ष्मण जाधव या तरुण ट्रॅक्टर चालकाने आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण जाधव (वय अंदाजे ३०) हा गावातील कष्टकरी ट्रॅक्टर चालक होता. काही महिन्यांपासून त्याला ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमचं अतिशय व्यसन जडलं होतं. सुरूवातीला कमी रकमेने खेळत असताना काहीवेळा जिंकल्यामुळे त्याला त्या गेमची सवय लागली. मात्र, नंतर त्याने मोठ्या प्रमाणावर पैसे गमावले.
वाढते नुकसान भरून काढण्यासाठी त्याने कर्ज घेण्यास सुरुवात केली. कुटुंब चालवण्यासाठी आणि ऑनलाइन गेममध्ये पैसे टाकण्यासाठी त्याने ओळखीच्या लोकांकडूनही कर्ज घेतले. मात्र, नुकसानच होऊ लागल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि त्यातून तो मानसिक तणावात गेला.
शनिवार रात्री किंवा रविवारी पहाटेच्या सुमारास लक्ष्मणने आधी पत्नी आणि लहान मुलाचा गळा घोटून खून केला असावा आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीवन संपवल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोमवारी सकाळी ही दुर्दैवी घटना उघड झाली, तेव्हा घरात तिघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेने गावात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गावकऱ्यांनी सांगितले की, लक्ष्मण मेहनती आणि मनमिळावू स्वभावाचा होता. मात्र काही काळापासून तो सतत मोबाईलमध्ये गुंतलेला दिसत होता. नंतर कळले की तो 'ऑनलाइन रम्मी' नावाच्या गेममध्ये पैसे लावून खेळत होता. कर्जबाजारी झाल्यानंतरही त्याने व्यसन सोडलं नाही आणि अखेर अशा भीषण टोकाला पोहोचला.
आज या घटनेनंतर सोशल मीडियावरून आणि गावकऱ्यांच्या वतीने एक कळकळीची विनंती केली जात आहे मित्रांनो, सुखाची अन् कष्टाची भाकर आयुष्यभर पुरते, पण जुगार, सट्टा, मटका, गुटखा हे सर्व तुमच्या आयुष्याचा शेवट करू शकतात. ऑनलाइन गेमच्या नादी लागू नका. नशा आणि व्यसनाचा शेवट नेहमीच अश्रू देतो.
घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, घटनेचा सखोल तपास सुरू आहे. आत्महत्येचे नेमके कारण व कर्जाची रक्कम किती होती याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
समाजाच्या पुढे एक मोठा सवाल उभा राहतो – मोबाईल आणि इंटरनेटच्या अति वापराने, विशेषतः ऑनलाइन जुगाराच्या विळख्यात सापडलेल्यांना वेळेत जागृत करणं गरजेचं आहे. अन्यथा अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबतीत सरकार आशा खेळावर बदी आणनार आहे का?
ReplyDeleteमुलांनी कुटुंबाचा विचार करावा सुरुवातीला
ReplyDelete