घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कोयाळ गावात २४ मेच्या मध्यरात्री घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण गावाला हादरवून गेली आहे. प्रदीप मधुकर मुंडे यांच्या घरात झोपेत असलेल्या त्यांच्या सख्या मुलगा व मुलीचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.
सात वर्षांची कोमल आणि पाच वर्षांचा शिवम हे रात्री साधारणतः १२ ते १ वाजेच्या दरम्यान झोपेत असताना त्यांच्या अंगावर साप चढून गेला आणि त्याने दोघांनाही दंश केला. काही वेळातच दोघांची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तातडीने दोघांना उपचारासाठी रुग्णालयात नेले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेने मुंडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली आहे. निष्पाप वयात दोन चिमुकल्यांचा असा अकाली मृत्यू झाल्याने गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत.
दुःखदायक
ReplyDelete