घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
घनसावंगी तालुक्यातील समृद्धी शुगर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. मात्र कारखाना प्रशासनाकडून ऊस तोडणी विषयी पक्षपाती करण्यात येत असल्याची दिसून येत आहे. तशी तक्रार जालन्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
ऊस तोड करताना प्रोग्राम नुसार व यादी जाहीर न करता. ऊस तोडण्यात येतो या बाबत कारखाना प्रशासनाकडे शेतकऱ्यांनी संपर्क साधला असता. ऊस तोडण्या संबंधी तुम्ही कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांना फोन लावा. त्यानंतरच तुमचा ऊस तोडल्या जाईल. असे सांगितले जाते यामुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांचा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाल्यामुळे याचा राग मतदान न केल्याच्या संशयावरून शेतकऱ्यांचा ऊस तोडण्यास चेअरमन सतीश घाटगे पिळवणूक करत आहे. तसेच वजन काट्यात हेरा-फेरी करून काटा मारण्यात येत असल्याचा शेतकऱ्यांना दाट सशय आहे.
दरम्यान कारखाना प्रशासनाने शेअर्सच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून डिपॉझिटची मागणी केली शेतकऱ्यांनी आपला ऊस हक्काने कारखान्याकडे जाईल म्हणून अनेक शेअर्स कारखान्याकडे जमा केले. वास्तविक शेतकऱ्यांची इच्छा नसताना तुमचा ऊस जाण्यास अडचण येईल म्हणून ऊस बिलातून कपात केली, कारखाना प्रशासनाचा अंदा-धुंद कारभार सुरू असून त्यांची सविस्तर चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी भाजपाचे तालुका अध्यक्ष शिवाजी बोबडे व माजी पंचायत समिती सदस्य रमेश बोबडे यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
यांचाच राजकीय डाव आहे साहेबांना बदनाम करण्याचा
ReplyDeleteBarobar ahe
ReplyDelete