अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !
तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम इलोसे क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.
यानंतर घनसावंगी येथील माळी गल्लीतील सविता म्हस्के यांच्या राहत्या घरी सापळा कारवाई राबविण्यात आली. यावेळी त्यांनी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक कोमल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सहाय्यक सापळा व तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी काम पाहिले. पोलीस उप अधीक्षक बाळू जाधव यांच्या पर्यवेक्षणाखाली तसेच पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. सापळा पथकात पोहेकॉ श्रीनिवास गुड्डुर, पोलिस अंमलदार गणेश चेके, गजानन कांबळे, शिवलिंग खुळे व अमोल चेके आदींनी केली.
Comments
Post a Comment