घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

अंबड- घनसावंगी तालुक्यात पोलीस पाटील आरक्षण सोडत

 अंबड-घनसावंगी तालुक्यात पोलिस पाटील भरतीसाठी गावनिहाय आरक्षण सोडत जाहीर


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      अंबड तहसील कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी (दि. ४ सप्टेंबर) अंबड व घनसावंगी तालुक्यातील पोलिस पाटील भरतीसाठी गावनिहाय आरक्षण सोडत पार पडली. ही सोडत अंबडचे उपविभागीय अधिकारी उमाप पारधी आणि तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक पद्धतीने पार पडली.

   या सोडतीत दोन्ही तालुक्यातील एकूण १८४ रिक्त गावांचा समावेश होता. आरक्षणनिहाय गावनिहाय सोडत काढण्यात आली असून, निवड झालेल्या उमेदवारांची यादी तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


सर्वसाधारण प्रवर्गाखाली निवडलेली गावे

      बोरगाव खुर्द, वाडी शिराढोण, भद्रेगाव, काटखेडा, गोरी, पांगरी, गोला, रामगव्हाण खुर्द, साकळगाव, राजेगाव, अंतरवाला बु, रामगव्हाण बु, वडी रामसगाव, मंगु जळगाव, राजणीवाडी, गंधारी, अवलगाव खुर्द, रेणापुरी, अबड, शहापुर, टाका, सारंगपुर, पांगरखेडा, हातडी, बोदलापुरी, रवना, मादळा, जालुरा, अंतरवाली टेभी, बहिरेगाव, खालापुरी, साडेसावंगी, माडर्डी, राहुवाडी संत सेवालाल नगर, जोगेश्वरवाडी, लमानवाडी, वलखेडा, पिंपरखेड खुर्द, कर्जत, शिरनेर, सौदलगाव खुर्द, नारायणगाव, कोठी, धोन्सी बु., बनटाकळी, देशगव्हाण, कोठाला खुर्द, दहीपुरी, भांबेरी, देवी देहेगाव, लालवाडी, राहेरा, आलमगाव, राजणी, मठ जळगाव, पानेवाडी, जामखेड, शिदखेड, डावरगाव, भुलेगाव, शेवता, शिंदेवडगाव, शहागड, रोहिलागड, निपाणी पिंपळगाव, झिरपी, पागीरवाडी, अंतरवाला आवा, वाळकेश्वर, मुद्रेगांव, खेडगांव, भोगगांव, अंतरवाली दाई, झोडेगांव, मंगरुळ, साष्टपिंपळगांव, एकलहेरा, मासेगांव, बळेगांव, लासुरा, बोडखा बु, कृष्णापुरवाडी, बानेगाव, दहीगव्हाण बु, चिंचखेड, शिवनगाव, वडीलासुरा, चिकनगांव, सौदलगाव बु, कुंभार पिंपळगाव, बोरी, मसई, करडगांव, गहीनाथनगर, धाकलगांव, पराडा, बनगांव आदी

महिला आरक्षणाखालील गावे

अनुसूचित जाती महिला प्रवर्ग : चंदनापुरी बु, यावल पिंप्री, बोर राजणी, अंतरवाली राठी, रामसगाव, घाणेगांव, उक्कडगांव

अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग : वाघलखेडा, शिराढोण, धनगर पिंप्री, बदापुर

विशेष मागास महिला : हरतखेडा, चाभारवाडी

विमुक्त जाती ‘अ’ महिला : घोन्सी तांडा नं.१, पांगरा तांडा

भटक्या जमाती ‘ब’ महिला : बेलगांव, चुर्मापुरी

भटक्या जमाती ‘क’ महिला : बठाण खुर्द, वडीगोदी

भटक्या जमाती ‘ड’ महिला : भगवान नगर, दहीपुरी, दैठणा ब, देवळी, भोकरवाडी

इतर मागासवर्गीय महिला : माळयाचीवाडी, हस्तपोखरी, अंतरवाली सराटी, राणी उंचेगाव, आपेगाव, ताडहादगाव, मठपिंपळगांव, मच्छीद्रनाथ चिंचोली, चित्रवडगांव

सामाजिक शैक्षणिक मागास महिला : आवा, लेभेवाडी, श्रीपत धामणगांव, पांगरा, चापडगांव

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक महिला : येवला, बाचेगांव, डहाळेगांव, मुर्ती, मुढेगांव, खडकावाडी, दोदडगाव

खुला महिला प्रवर्ग : करजळा, अरगडेगव्हाण, देवहिवरा, नागझरी, कुरण, राजुरकरकोठा, दहीगव्हाण खुर्द, कृष्णनगर, विरेगव्हाण तांडा, रामनगर, गादेसावरगाव, भोकरवाडी, देवळी

खुला सर्वसाधारण प्रवर्गाखालील गावे

    मुरमा खुर्द, इंदलगाव, भेडाळा, देवडीहादगाव, माहेरजवळा, गुरुपिंप्री, लिंबी, कंडारी, सरफगव्हाण, लिंबोणी, कुक्कडगाव, सिध्देश्वर पिंपळगाव, शेवगळ, पाथरवाला बु, सोनक पिंपळगाव, भादली खुर्द, भालगाव, दाढेगाव, पिठोरी सिरसगाव, दुनगाव, पिरगैबवाडी, दहयाळा, ईश्वरनगर, वसतनगर, झिरपी तांडा, गंगारामवाडी, बक्ष्याचीवाडी, गुनानाईक तांडा, निहालसिंगवाडी, कौचलवाडी, गोविंदपुर, यावलपिंप्री तांडा.



Comments

  1. मंठा तालुका पोलीस पाटिल आरक्षणा नुसार भरती कधी निघणार आहे.काही न्युज आली तर टाका सर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या