घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी गेवराई येथे लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. याच दरम्यान आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी चौकात येऊन घोषणाबाजी केली. दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर वाद विकोपाला गेला आणि प्रत्यक्ष चकमकीचे स्वरूप धारण केले.
विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलक नेते लक्ष्मण हाकेंच्या अंगावर चपला फेकल्या.
प्रत्युत्तरात हाकेंचे समर्थक गाड्यांवर उभे राहून दांडके दाखवत आक्रमक पवित्रा घेतला.
परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
घटनेनंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गेवराई पोलिसांनी तातडीने सुमोटो गुन्हा दाखल केला.
एकूण १४ जणांविरोधात गुन्हा नोंदवला गेला.
गुन्ह्यात लक्ष्मण हाके यांचाही समावेश करण्यात आला आहे.
आरोपींवर योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
या चकमकीमुळे गेवराई परिसरातच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे.
ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनाला या घटनेनंतर नवे वळण मिळाले.
हाके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे ओबीसी चळवळीतील चर्चा अधिक तीव्र झाली आहे.
विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आणि हाके यांचे समर्थक यांच्यातील संघर्षामुळे स्थानिक राजकारणातही नवीन समीकरणांची चर्चा सुरू आहे.
ज्यांनी घडवून आणला त्यांच्या वर काहीच कारवाई नाही आणि ज्यांच्या वरती हल्ला झाला त्यांच्या वरती कारवाई....
ReplyDeleteअजब कारभार , गजब शासन