घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना DBT पोर्टलद्वारे १५ कोटींचा निधी मिळणार

कोणत्या तालुक्याला किती मिळणार रक्कम 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शासनाकडून डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पोर्टलद्वारे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यामध्ये वित्तीय मदतीचा निधी वितरीत केला जाणार आहे. याबाबतची निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

    त्यानुसार, एकूण 9,277 शेतकऱ्यांना तब्बल 15 कोटी 90 लाख 99 हजार 88 रुपये इतका निधी त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. तालुकानिहाय निधीचे वितरण पुढीलप्रमाणे होणार आहे

परतुर तालुका – 213 शेतकरी : ₹27,45,099
मंठा तालुका – 570 शेतकरी : ₹67,25,789
जालना तालुका – 347 शेतकरी : ₹30,79,392
जाफ्राबाद तालुका – 512 शेतकरी : ₹53,90,000
घनसावंगी तालुका – 1,717 शेतकरी : ₹2,54,05,090
भोकरदन तालुका – 131 शेतकरी : ₹21,10,671
बदनापूर तालुका – 55 शेतकरी : ₹8,41,874
अंबड तालुका – 5,732 शेतकरी : ₹11,28,01,146

     यामध्ये अंबड तालुका आघाडीवर असून सर्वाधिक 5,732 शेतकऱ्यांना 11 कोटींपेक्षा अधिक रक्कम वितरीत होणार आहे. त्यानंतर घनसावंगी तालुक्यातील 1,717 शेतकऱ्यांना 2 कोटींहून अधिक निधी दिला जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर रक्कम जमा होणार

     DBT प्रणालीमुळे शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात आर्थिक लाभ मिळणार असून कोणत्याही मध्यस्थाशिवाय रक्कम प्राप्त होणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे पारदर्शकता आणि जलद निधी वितरण शक्य झाले आहे.

प्रशासनाचा पुढाकार

     या निधी वितरणासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी करण्यात आली असून संबंधित यंत्रणांना सूचनाही दिल्या गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यात निधी जमा झाल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments

  1. लोक खात चेक करूण करूण दमलेत.
    नेमके कधी.कुणाला आणि कशाचे पैसे मीळणार ते सांगा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या