घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
"माफ करा... मला हे करावं लागलं. मी थकलोय. सततचं टार्गेट, अपमान, आणि धमक्या सहन होत नाहीत," असे शब्द त्यांच्या चिठ्ठीत आढळून आले.
प्राप्त माहितीनुसार शिवशंकर मित्रा हे गेल्या पाच वर्षांपासून बारामती शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ते अतिशय प्रामाणिक, मनमिळावू आणि कामाला वाहून घेतलेले अधिकारी होते. मात्र गेल्या काही काळात त्यांच्यावर बँकेकडून येणाऱ्या कामगिरीच्या दबावामुळे मोठा मानसिक ताण निर्माण झाला होता.
सुसाईड नोटनुसार, मित्रा यांच्यावर वरिष्ठांकडून कर्ज वसुली, नवीन खात्यांची संख्या, विमा विक्री इत्यादी बाबतीत अत्यधिक टार्गेटचे दडपण होते. कामगिरी कमी असल्यास वेळोवेळी अपमान, दमबाजी आणि शाब्दिक धक्के दिले जात होते अशी माहिती मिळाली.
मैं आज बैंक मैं शिव शंकर मित्रा आफ बड़ौदा, बारामती के अतिरिक्त दवान के कारण आल्य कर रहा हूँ। मुझे बैंक से अनुरोध में कि कर्मचारियों पर अतिरिक्त दबाव न होने सभी को अपनी जिम्मेदारी का अहसास है उसे अपना 100% देते हैं। मैं आत्महला अपनी इच्छा से होशोहवास में कर रहा हूँ। इसम मेरे परिवार की कोई जिम्मेदारी नहीं है मैं बैंक के high pressure के कारण ला कर रहा है।
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून, सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रातील मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेक बँक कर्मचारी आजही टार्गेटच्या दबावाखाली काम करत असून, त्यांची मानसिक अवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे.
शिवशंकर मित्रा यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या जाण्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी आणि बँकेतील सहकाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून, अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
Very sad 😔 RIP
ReplyDelete