घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

घनसावंगी-अंबड रोडवर भीषण अपघात; शेतकरी युवक ठार

 १० वर्षांचा मुलगा गंभीर जखमी


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      घनसावंगी ते अंबड रोडवरील बोलेगाव पाटीजवळ काल (दि. २३ जून) दुपारच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी अपघातात लिंबोनी (ता. घनसावंगी) येथील शेतकरी गणेश भुजंगराव काळे (वय ३५) यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या दुचाकीवर मागे बसलेला १० वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

     प्राथमिक माहितीनुसार, गणेश काळे हे आपल्या मुलाला संभाजीनगर येथील शाळेत सोडण्यासाठी दुचाकी (मोटरसायकल) वरून निघाले होते. बोलेगाव शिवारात समोरून भरधाव वेगात अंबडकडून परभणीकडे जाणाऱ्या एमएच २२ एएफ ४२४८ क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की मुलगा सुमारे २० फुटांवर उडून जाऊन पडला, तर गणेश काळे हे गाडीपासून बऱ्याच अंतरावर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

     दुचाकीवर मागे बसलेला १० वर्षांचा मुलगा गंभीर जखमी अवस्थेत घटनास्थळी आढळून आला. काही प्रवाशांनी माणुसकी दाखवत त्याला तात्काळ घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जखमी मुलाला अधिक उपचारासाठी जालना येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. लहान वयातच वडिलांचे छत्र हरवलेल्या या मुलावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

    घटनास्थळी बीट जमादार गोल्डे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ भेट देत कारवाई सुरू केली. घनसावंगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

    रात्री आठ वाजता लिंबोनी गावात गणेश काळे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, काका-काकू, भाऊ असा परिवार आहे. या भीषण अपघाताने लिंबोनी व परिसरात शोककळा पसरली.

Comments

  1. अतिशय दुःख झाले बातमी वाचून अशी वेळ दुश्मनावर सुध्दा येऊ नये, भावपूर्ण श्रद्धांजली.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या