घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

दारूबंदीचा निर्धार: मच्छिंद्रनाथ चिंचोली ग्रामसभेत महिलांचा पुढाकार, ठराव मंजूर

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली  या गावात झालेल्या ग्रामसभेत गावात कडकडीत दारूबंदी लागू करण्याच निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या निर्णयामध्ये गावातील महिलांनी पुढाकार घेत महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामसभेत मांडण्यात आलेला दारूबंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून, गावातील समाजहिताच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

  गावकरी महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून गावाच्या हद्दीत विविध प्रकारचे नशेचे पदार्थ – देशी दारू, बनावट मद्य, तसंच अन्य व्यसनी घटकांची बिनधास्त विक्री सुरू होती. या समस्येमुळे गावातील सुमारे 25 ते 30 युवक व्यसनाधीन झाले असून, यामध्ये 10 ते 15 युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या गोष्टीमुळे गावाची सामाजिक शिस्त, शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे.

स्वतःहून साथ देणारे व्यावसायिक

   दारूबंदीच्या निर्णयानंतर गावातील काही दुकानदारांनी समाजहितासाठी स्वतःहून दारू विक्री थांबवली आहे. गावात आता नशामुक्तीच्या दिशेने एकजूट दिसत आहे.

महिलांची निर्णायक भूमिका

   या संपूर्ण मोहिमेत महिलांनी घेतलेला पुढाकार वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी दारूबंदीचा ठराव ग्रामसभेत सादर केला आणि तो एकमताने मंजूर करून घेतला. ग्रामसेवक, सरपंच मनिषा घोगरे, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ आणि युवावर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

प्रशासनाकडे ठाम मागणी

   ग्रामस्थांनी प्रशासनाकडे ठाम मागणी केली आहे की, मच्छिंद्रनाथ चिंचोली गावाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारच्या नशेच्या पदार्थांची विक्री होऊ नये, तसेच या गोष्टीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी. प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी आणि गावाला नशामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.


Comments

  1. नुसती कागदावरच दारू बंदी करू नका

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या