घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
या अलर्टच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नदी काठावर वसलेल्या गावांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे पूरपरिस्थिती उद्भवू शकते, त्यामुळे गावकऱ्यांना आवश्यकता भासल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची तयारी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
प्रशासनाकडून संबंधित आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांना पूर्ण सज्ज राहण्याचे आदेश दिले गेले असून, वादळी वारा, पाऊस, विजेचा कडकडाट यामुळे कोणतीही हानी झाल्यास तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास माहिती कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घ्यावा
विजेच्या कडकडाटात सुरक्षित ठिकाणी थांबावे
वीजेच्या खांबांपासून, झाडांपासून अंतर राखावे
शेतीमध्ये काम करताना विशेष काळजी घ्यावी
अलीकडेच मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे. अशा स्थितीत हवामान खात्याचा यलो अलर्ट हा नवीन संकटाचा इशारा मानला जात असून, शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.
प्रशासनाकडूनही सतत संपर्कात राहून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. नदी काठची गावं, शेतकरी बांधव, नागरिक यांनी हवामानाची माहिती नियमित तपासावी आणि कोणतीही आपत्ती घडल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
आपत्तीला रोखता येत नाही, पण सजगता आणि सतर्कतेने नुकसान टाळता येते - प्रशासनाकडून नागरिकांना सहकार्याची अपेक्षा!
हवामान अभ्यासक राजाभाऊ उगले यांनी सांगितले की केरळ ते महाराष्ट्र एकाचवेळी मान्सून दाखल झाला आहे. १५ मे पासून सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली असून, पुढील काही दिवस हे पावसाचं रूप अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः २५ ते ३१ मे या कालावधीत राज्याच्या विविध भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण व मुंबई: पुढील पाच दिवसांत ७०० ते १००० मिमी पावसाचा अंदाज. जनजीवन विस्कळित होण्याची शक्यता. पश्चिम घाट आणि दक्षिण महाराष्ट्र: कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे येथेही जोरदार पावसाचा इशारा.
मराठवाडा व विदर्भ: नाशिक, अहमदनगर (अहिल्यानगर), छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली आणि पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाची तीव्र शक्यता.
मुंबई आणि कोकणातील धरणांमध्ये जलसाठा वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून, पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही बाब आशादायक आहे.
३० किंवा ३१ मेपासून पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असून, त्यानंतर राज्यात उघडीप पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
सिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी पावसाच्या या काळाचा योग्य उपयोग करावा. पुरेसा ओलावा लक्षात घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा. हवामानाचा अंदाज सतत तपासत शेतीचं नियोजन करावं.
संदर्भ: ECMWF हवामान मॉडेल
Comments
Post a Comment