घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

अबब तब्बल ४१ लाखाची मागितली लाच:२३ लाख घेतले ५ लाख घेतांना उपजिल्हाधिकारी व महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

शेतजमिनीच्या कामासाठी ४१ लाखांची लाच मागणी,२३ लाख घेतले व ५ लाख घेताना निवासी उपजिल्हाधिकारी आणि महसूल सहाय्यक यांना रंगेहात पकडले


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दीपक त्रिभुवन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) च्या पथकाने आज सापळा रचून रंगेहात अटक केली. दोघांनी मिळून शेतजमिनीच्या वर्गवारी बदलाच्या कामासाठी तब्बल ४१ लाख रुपयांची लाच मागितल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. यातील २३ लाख आधीच स्वीकारले असून, आज ५ लाख रुपये घेताना ते एसीबीच्या जाळ्यात अडकले

तक्रारदाराची कहाणी

    तक्रारदार आणि त्यांचे भागीदार यांनी 2023 मध्ये मौजे तिसगाव (गट नं. 225/5) येथील 6 एकर 16 गुंठे जमीन, जी वर्ग 2 मधील होती, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून खरेदी केली होती. ही जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी आवश्यक असलेले शासनाच्या चलन जनरेशनचे काम करण्यासाठी आरोपींनी लाच मागणी केली होती.


मागणीची रक्कम आणि सापळा कारवाई

   तक्रारदाराकडून आधीच 23 लाख रुपये घेतल्यावर, उर्वरित कामासाठी 18 लाख रुपयांची लाच मागणी झाली. यातील 5 लाख रुपये देताना सापळा रचून त्रिभुवन यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर रंगेहाथ पकडण्यात आले. याचवेळी स्वतंत्र पथकाने निवासी उपजिल्हाधिकारी खिरोळकर यांनाही त्यांच्या केबिनमधून ताब्यात घेतले.


गुन्हा दाखल, जप्ती व तपास

    एसीबीने या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7, 7अ व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आरोपी क्रमांक 1 दीपक त्रिभुवन यांच्याकडून सॅमसंग मोबाईल व 3,000 रुपये रोख, तर आरोपी क्रमांक 2 विनोद खिरोळकर यांच्याकडून iPhone 15 Pro Max आणि त्यांच्या केबिनमध्ये 75,000 रुपये रोख रक्कम सापडली आहे.


तपास पथक आणि मार्गदर्शक अधिकारी

    सापळा कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांनी केले. त्यांना पोलीस उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे, दिलीप साबळे, तसेच पोलीस अधीक्षक संदीप आटोळे व अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव यांचे मार्गदर्शन लाभले. कारवाईत २५ पेक्षा अधिक अधिकाऱ्यांचा सहभाग होता.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या