घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
हा अपघात मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास जालना - बीड महामार्गावर सुखापुरी फाट्यावर घडला. ट्रॅव्हल्स आणि टेम्पोमधील प्रवाशांची संख्या पाहता अधिक मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती, परंतु तत्काळ मदतीमुळे काही जणांचे प्राण वाचले. जखमींवर अंबड आणि जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मृत मायलेकींची नावे अंजना पुरुषोत्तम सापनर (वय ३०) आणि अनुसया पुरुषोत्तम सापनर (वय १३) अशी असून त्या दोघी धानोरा, ता. शेणगाव, जि. हिंगोली येथील रहिवासी आहेत. या अपघातात पुरुषोत्तम नाथराव सापनर आणि कृष्णा पुरुषोत्तम सापनर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यांना अंबड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
तसेच, बाळू शेळके , सतीश लव्हटे (रा. तळेगाव ता. भोकरदन), विजय नेहारकर (रा. परळी), संदीप उमाजी शेप आणि यश फुलारे (रा. शेपवाडी) हे किरकोळ जखमी झालेत.
या दुर्घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य हाती घेतले. अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट असले तरी अंधार, वेग आणि चुकीच्या दिशेने वाहनचालना मुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने अपघाताबाबत चौकशी सुरू केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
Comments
Post a Comment