घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार आवश्यक दाखले! जालना जिल्ह्यात "दाखला आपल्या दारी" उपक्रम

जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचे आदेश 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जालना (सामान्य प्रशासन विभाग) यांच्या वतीने "दाखला आपल्या दारी" हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये २६ मे २०२५ ते १० जून २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश इयत्ता १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेली विविध प्रमाणपत्रे – जसे वय, जात, उत्पन्न, अधिवास, रहिवास इत्यादी – शाळेच्या ठिकाणीच व विहित वेळेत प्रदान करणे हा आहे.

उपक्रमाची अंमलबजावणी खालील टप्प्यांमध्ये होणार

१. शिबीरांचे आयोजन (२६ मे – २७ मे)

    संबंधित शाळांमध्ये शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे गोळा केली जातील. शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी व आपले सरकार सेवा केंद्राचे कर्मचारी उपस्थित राहणार.

2. अर्ज व कागदपत्रांची पडताळणी (२८ मे – ३० मे)

    विद्यार्थ्यांचे अर्ज अचूक भरून घेऊन आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून तात्काळ ऑनलाइन अपलोड करण्यात येणार.

3. अर्ज निकाली काढणे (३१ मे – ३ जून)

   ऑनलाईन अर्जांना दोन दिवसात प्राधान्याने मंजुरी देण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

4. प्रमाणपत्रांचे वितरण (४ जून – ७ जून)

  मंजूर प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठविण्यात येणार किंवा प्रत्यक्ष पोहोचविण्यात येणार आहेत.

5. अंतिम अहवाल सादर करणे (१० जून)

   सर्व अंमलबजावणीबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास १० जून २०२५ पूर्वी सादर करणे बंधनकारक आहे.


महत्त्वाच्या सूचना

   मुख्याध्यापक, तलाठी, ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्राचे प्रतिनिधी यांना शिबिरास उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही; केवळ शासन नियमानुसार शुल्क आकारण्याची परवानगी.

   सर्व मुख्याध्यापकांची यादी मोबाईल नंबरसह Excel Sheet मध्ये dcolljalna@gmail.com या मेलवर पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, जालना यांनी या उपक्रमासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवून अंमलबजावणीसाठी स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

घनसावंगी तालुक्यातही उपक्रम 

 जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार घनसावंगी तालुक्यात "दाखला आपल्या दारी" या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी तहसिल कार्यालय घनसावंगीच्या मार्फत करण्यात येणार आहे. अशी माहिती तहसिलदार योगिता खटावकर यांनी दिली.


 शिबिरांचे आयोजन स्थळ व दिनांक 26 मे ते 27 मे 

संत रामदास कॉलेज, घनसावंगी

मत्स्योदरी ज्युनिअर महाविद्यालय, घनसावंगी

सुर्यनारायण ज्युनिअर महाविद्यालय, कुं. पिंपळगाव

मौ. गुलाम ज्युनिअर महाविद्यालय, रांजणी


28 मे ते 30 मे 

कै. दादासाहेब देशमुख विद्यालय, घनसावंगी

सरस्वती भुवन प्रशाला, कुं. पिंपळगाव

ओम शांती विद्यालय, अंतरवाली टेंभी

म. फुले विद्यालय, पानेवाडी

म. फुले विद्यालय, बोररांजणी

31 मे ते 3 जून – ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचे निवारण

4 जून ते 7 जून – प्रमाणपत्रांचे वाटप

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या