अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालन्यात खताचा २० लाखांचा बेकायदेशीर साठा जप्त

 जालना कृषी विभागाची मोठी कारवाई: चंदनझीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात कृषी विभागाने मोठी कारवाई करत उत्पादनास बंदी असलेल्या फॉस्फोजप्सिम या खताचा तब्बल २० लाख रुपये किमतीचा ३२० मेट्रिक टन साठा जप्त केला आहे. ही धडक कारवाई २८ मे बुधवार रोजी करण्यात आली असून, त्यामुळे कृषी व खत क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

       सदरील कारवाई कृष्णा फास्केईम लिमिटेड या कंपनीच्या जालना-राजूर मार्गावरील गुंडेवाडी शिवारात भाड्याने घेतलेल्या दोन गोदामांवर करण्यात आली. रेल्वे रॅकद्वारे जालना जिल्ह्यात येणाऱ्या खतांची कृषी विभागाकडून नियमित तपासणी केली जाते. त्याच दरम्यान, काही गोपनीय माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या पथकाने या गोदामांवर छापा टाकला असता बंदी असलेल्या फॉस्फोजप्सिम खताचा मोठा साठा आढळून आला.

     ऑक्टोबर २०२४ नंतर शासनाने फॉस्फोजप्सिम या खताच्या उत्पादन व वापरावर बंदी घातली असूनही संबंधित कंपनीकडून बेकायदेशीररित्या साठवणूक केली जात होती. जप्त करण्यात आलेला साठा सील करण्यात आला आहे.

  

     ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे गुण नियंत्रक आशिष काळुसे, जिल्हा कृषी अधिकारी विशाल गायकवाड, मोहीम अधिकारी निलेशकुमार भदाणे, विभागीय कृषी सहसंचालक पी.आर. देशमुख, जिल्हा कृषी अधिकारी जी.डी. कापसे, कृषी विकास अधिकारी पी.बी. बनसावडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाई खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी गुणवत्तापूर्ण खत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.

 या प्रकरणी कंपनीच्या कायदेशीर जबाबदार व्यक्तींसह संचालक मंडळाविरुद्ध खत नियंत्रण आदेश नुसार चंदनझीरा पोलीस ठाण्यात संबंधित कंपनी व आणखीन एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास चंदनझिरा पोलीस करीत आहे.



Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या