अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

बीड - अनैतिक संबंधाच्या संशयावरून युवकाचा खून

सात आरोपी ताब्यात, एक फरार


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेत अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका २७ वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आला अशी माहिती मिळाली असून त्याचा एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले असून एकजण फरार आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे करीत आहेत.


घटनेचा तपशील

    पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केज तालुक्यातील भाटुंबा येथील रहिवासी दगडू उर्फ अण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे (वय २७) आणि त्याचा मित्र सचिन करपे यांना २६ मे २०२५ रोजी दुपारी ४.३० वाजता सावळेश्वर (ता. केज) येथे अडवण्यात आले. रोहन मरके, सोन्या मस्के (रा. सावळेश्वर) व लाडेगाव येथील चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवून रोहन मस्के यांच्या मामाच्या शेतात घेऊन गेले.

   तेथे ज्ञानेश्वर धपाटे याला झाडाला बांधून लाकडी काठी व बेल्टने अमानुष मारहाण करण्यात आली. यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला पावनधामजवळ रस्त्यावर फेकून देण्यात आले. या घटनेत त्याचा मित्र सचिन करपे हा जखमी झाला आहे.


भाऊस दिली मोबाईलवरून माहिती

    मारहाणीनंतर आरोपींनी ज्ञानेश्वरच्या मोबाईलवरून त्याचा भाऊ सिद्धेश्वर धपाटे याला फोन करून माहिती दिली. त्यानंतर सिद्धेश्वर व गावातील काही लोकांनी जखमी ज्ञानेश्वर आणि सचिनला अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान ज्ञानेश्वर धपाटे याचा मृत्यू झाला.


गुन्हा दाखल; सात आरोपी ताब्यात, एक फरार

    या प्रकरणी सिद्धेश्वर धपाटे यांच्या तक्रारीवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून एकजण अद्याप फरार आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

    ही घटना तालुक्यात खळबळ उडवणारी असून अनैतिक संबंधाच्या संशयावरून एखाद्याचा जीव घेण्याची ही अमानुष घटना समाजाला हादरवून टाकणारी आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या