घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

भीषण अपघातात सहा तरुण ठार:माणुसकी दाखवत मदतीस धावलेल्या तरुणावर काळाचा घाला

अपघातग्रस्त वाहन उचलताना काळाने घेतला विडा; मदत करणाऱ्या सहा जणांचा कंटेनरखाली चिरडून मृत्यू



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   अत्यंत दुर्दैवी व हृदय हे लावून टाकणारी घटना बीड जिल्ह्यातून समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात माणुसकी दाखवत मदतीस धावलेल्या सहा तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. सोमवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास गढी गावाजवळ ही हृदयद्रावक घटना घडली. बीडवरून गेवराईकडे जाणारी जीप रस्त्याच्या बाजूला उलटली होती. स्थानिक तरुणांनी क्रेनच्या मदतीने ती बाजूला करण्याचा प्रयत्न करत असताना भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने त्यांना चिरडले. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.


अपघाताची भीषणता काळजाचा ठोका चुकवणारी

     मिळालेल्या माहितीनुसार सदर जीप पावसात रस्त्यावरील नियंत्रण सुटल्याने गडगडत खाली गेली. ही घटना पाहून गेवराईकडे जाणारे काही तरुण तातडीने मदतीस धावले. त्यांनी क्रेन बोलावून जीप बाजूला घेतली जात असताना अचानक भरधाव कंटेनरने धडक दिली. मदतीला धावलेले हे तरुण कंटेनरखाली चिरडले गेले. धडकेनंतर कंटेनर घटनास्थळावर न थांबता पुढे निघून गेला.


घटनास्थळी हंबरडा आणि संताप

    अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि नातेवाईक घटनास्थळी धावले. जखमींना तत्काळ गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सहा जणांना मृत घोषित केले. रुग्णालयात नातेवाईकांचा हंबरडा फूटला. अनेकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर रोष व्यक्त केला.


मृतांची नावे अशी

1. सचिन रमेश नन्नवरे (वय ३५, रा. संजयनगर, गेवराई)

2. बाळासाहेब ज्ञानोबा आतकरे (वय ३६, रा. सावतानगर, गेवराई)

3. दीपक राजपाल सुरय्या (वय ४२, रा. गढी)

4. कृष्णा जाधव (वय ३५, रा. संजयनगर, गेवराई)

5. भागवत गंगाधर परळकर (वय ३९, रा. रंगार चौक, गेवराई)

6. मनोज वैजिनाथ करांडे (वय ३९, रा. रांजणी)

जखमींची नावे

योगेश शिंदे (रा. खळेगाव) एक अन्य जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


वाहतूक कोंडी आणि पावसाचा अडथळा

  या अपघातामुळे बीड-गेवराई महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यातच पावसाने उग्र रूप धारण केल्याने मदतकार्य अडचणीत आले.

    ही घटना केवळ अपघात नसून मदतीला धावलेल्या माणुसकीवरच काळाने घाला घातल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.


 

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या