घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

धक्कादायक! महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू

 ऊसाला खत देत असताना शेतातच झाला जीवघेणा अपघात


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      महावितरणच्या हलगर्जी कारभारामुळे शेतकरी बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हादरवून टाकणारी घटना आज समोर आली आहे. ऊसाच्या शेतात खत देत असताना विद्युत तारेचा जबरदस्त शॉक लागल्याने वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.ही हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मारफळा गावात घडलीय.


शेतातील लोंबकळत्या विद्युत तारांचे बळी

   मिळालेल्या माहितीनुसार मृत्यूमुखी पडलेले अभिमान कबले (वय ५०) आणि त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर कबले (वय २३) हे सकाळच्या सुमारास आपल्या शेतात खत देण्याचे काम करत होते. याच वेळी त्यांच्या शेतात विद्युत तारा जमिनीवर पडलेली होती, ज्यामध्ये विद्युत प्रवाह सुरू होता. त्या तारेला स्पर्श झाल्याने दोघांनाही जोरदार शॉक बसला आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळाली.


रुग्णालयात नेत असतानाच अखेरचा श्वास

    ही घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी तातडीने दोघांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. एका कुटुंबातील दोन सदस्यांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.


महावितरणच्या दुर्लक्षामुळे घेतले प्राण

    या घटनेमुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही शेतातील लोंबकळत्या व तुटलेल्या विद्युत तारा दुरुस्त केल्या जात नाहीत. यामुळे अपघाताची शक्यता वाढते आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.


गावकऱ्यांची संतप्त मागणी

   या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत, नुकसानभरपाई आणि सरकारी नोकरीची भरपाई द्यावी, अशी मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली आहे.


सरकार आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे

    गावकऱ्यांनी प्रशासन आणि महावितरणला इशारा दिला आहे की, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर शेतांतील विद्युत तारांची वेळोवेळी तपासणी आणि दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा, भविष्यात आणखी निष्पाप जीव गमवावे लागतील.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या