घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

शेतकऱ्यांनो सावधान! डांबरी रस्त्यांची खोदकामे करताना शेतकऱ्यांनी परवानगी घेणे अनिवार्य नसता भरावा लागेल दंड

 ग्रामसडक योजनेंतर्गत कडक कारवाईचा इशारा


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

 प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत रस्त्यांची निगा राखण्याच्या अनुषंगाने एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, जालना यांनी शेतकरी व नागरिकांना आवाहन केले आहे की, शेतीसाठी पाईपलाईन टाकणे, विहीर खोदणे, पाण्याच्या किंवा ड्रेनेज लाईनसाठी रोड क्रॉसिंग करण्यासाठी कोणतेही खोदकाम करताना संबंधित विभागाची परवानगी घेणे अत्यावश्यक आहे.

    बिनपरवानगी रस्त्यांचे नुकसान झाल्यास संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून नुकताच बाभूळगाव येथील सदाशिव त्र्यंबक राऊत यांनी भोकरदन – इजिमा – बाभूळगाव – कोदोली रस्त्यावर नाहरकत न घेता व कार्यालयास कोणतीही पूर्वसूचना न देता डांबरी पृष्ठभाग आणि मुरूम बाजूपट्या खोदल्याचे निदर्शनास आले आहे.

या प्रकरणी कार्यालयाने खालीलप्रमाणे दंड आकारणी केली आहे:

डांबरी रस्ता खोदकाम (3.75 मीटर): प्रती मीटर ₹5500 प्रमाणे एकूण ₹20,625

मुरूम बाजूपट्या खोदकाम (3.00 मीटर): प्रती मीटर ₹1150 प्रमाणे एकूण ₹3450

एकूण रक्कम भरणा: ₹24,075

   ही रक्कम 7 दिवसांच्या आत भरावी, अन्यथा शासन नियमांनुसार कडक दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे.

   या अनुषंगाने, सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, पाईपलाइन, विहीर खोदकाम, जलवाहिनी टाकणे अथवा अन्य कोणतेही सार्वजनिक रस्त्यावरचे काम करताना, संबंधित विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी. रस्ते व त्यांच्या पायाभूत सुविधा जपण्याची जबाबदारी सर्वांची असून कोणत्याही चुकीच्या कृतीस शासन दुर्लक्ष करणार नाही.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या