घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
मिळालेल्या माहितीनुसार हैद्राबादहून शिर्डीकडे भरधाव वेगाने जात असलेल्या इरटीगा कार क्रमांक एपी ११ एटी ०४५५ या वाहनाच्या चालकाला अचानक डुलकी लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कारने दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक आर जे ३२ जीई ०२९१ ला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पी. रमेश पी. कृष्णामूर्ती (वय ४५, रा. मदनपेठ, मलकपेठ, हैद्राबाद) यांचा जागीच मृत्यू झाला, तर श्रीराम दहीता (वय २५, रा. हैद्राबाद) हा युवक जखमी झाला आहे.
अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून मृत व्यक्तीला वाचवण्यासाठी महामार्ग आपत्कालीन सेवा १०३३ ची रुग्णवाहिका व मदतनीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा व कारच्या अडकलेल्या भागांना लोखंडी पहार व टांबीच्या सहाय्याने तोडून मृतदेह व जखमी व्यक्तीला बाहेर काढण्यात आले. मृतदेह वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली होती. गोंदी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
धुळे-सोलापूर महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून, रस्त्यावर वाहतुकीचा वेग व चालकांची निष्काळजीपणा यामुळे अशा घटना घडत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासन व वाहतूक पोलिसांनी या मार्गावर अधिक गस्त वाढवावी व ड्रायव्हरना वाहन चालवताना आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment