घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे अंधाराचे साम्राज्य; महावितरणच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त

 दरवर्षीच पावसाळ्यापूर्वी देखभाल आणि दुरुस्तीची कामे मग झाडे वर्षातच एवढी वाढतात तरी कशी ?


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

 मे महिन्याच्या प्रखर उकाड्यात एकीकडे उष्णतेने हैराण झालेल्या ग्रामस्थांना दुसरीकडे सततच्या विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे. वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसामुळे वारंवार विजेचा फॉल्ट होत असून, महावितरणकडून वेळेवर देखभाल व दुरुस्ती न झाल्यामुळे ही परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. परिणामी, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप पसरला आहे.दरम्यान दरवर्षीच पावसाळ्यापूर्वी देखभाल आणि दुरुस्तीची कामे मग झाडे वर्षातच एवढी वाढतात कशी असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

सतत विजेचा खोळंबा, नागरिक त्रस्त

     घनसावंगी तालुक्यातील अनेक गावे सध्या वारंवार होणाऱ्या विजेच्या खंडनामुळे अंधारात बुडाली आहेत. रात्रीच्या वेळेस १३२ केव्ही उपकेंद्रातून होणारा पुरवठा वारंवार ट्रिप होत आहे. झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर आदळल्याने, लोंबकळत्या वायर आणि फुटलेल्या इन्सुलेटरमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होतो आहे. पाण्याच्या टाक्या भरल्या जात नाहीत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिक उकाड्याने आणि पाण्याच्या टंचाईने हैराण झाले आहेत.


महावितरणच्या मनमानीवर ग्रामस्थ संतप्त

     महावितरणकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी देखभाल आणि दुरुस्तीची कामे केली जात असल्याचे दाखवले जाते. मात्र प्रत्यक्षात ही कामे केवळ कागदावरच मर्यादित राहतात. अनेक खांबांवर अजूनही वर्षभर जुने झाडांचे फांद्या आढळतात. त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मर जुनाट असून, केबल्स तुटलेल्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी डिस्ट्रिब्युशन बॉक्समध्ये पाणी शिरल्याने इन्सुलेटर जळाले आहेत, तर उघड्या केबल्समुळे ब्लास्ट होण्याचे प्रकारही समोर आले आहेत.

शेती व शिक्षणावर परिणाम

    वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शेतीसाठी वापरण्यात येणारे पंप सेट बंद पडले असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दुसरीकडे, परीक्षेच्या तयारीत व्यस्त असलेल्या विद्यार्थ्यांनाही अंधारामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्री अभ्यास करता न आल्यामुळे त्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे. गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही महावितरणचे अधिकारी वेळेवर दुरुस्तीसाठी येत नाहीत, अशी जोरदार नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.

तत्काळ उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

    ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर महावितरणने वेळेवर देखभाल आणि दुरुस्तीचे काम न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. "दर वर्षी हीच परिस्थिती, पण कोणतीही सुधारणा नाही. आता आम्ही शांत बसणार नाही," असे रोषाने गावकऱ्यांनी सांगितले.

वादळी पावसाने कहर; विजेचे २५ पोल उखडले, वीजपुरवठा खंडित

बुधवारी सायंकाळी तीर्थपुरी आणि परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने कहर केला. खापरदेव हिवरा, कंडारी, मुरमा, टेंभी अंतरवाली, कोठी, मुद्रेगाव, मंगरूळ, भायगव्हाण, बाचेगाव, देव हिवरा, एकरूखा, तनवाडी आदी गावांमध्ये वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे विजेचे तब्बल २५ पोल उखडून पडले. त्यामुळे १२ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करत १६ तासांच्या प्रयत्नांनंतर वीजपुरवठा सुरळीत केला.

प्रतिक्रीया 

    या गंभीर परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना स्थानिक आमदार हिकमत उढाण यांनी महावितरणच्या कामकाजावर टीका केली. त्यांनी सांगितले, "दरवर्षी पावसाळ्यापूर्वी देखभाल केली गेल्याचे महावितरण सांगते, पण प्रत्यक्षात काहीही होत नाही. कित्तेक वर्षापासून गावागावात तुटलेल्या वायर, झाडांच्या फांद्या, जळालेले इन्सुलेटर यामुळे जनता त्रस्त आहे. मी स्वतः महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करणार आहे.

- डॉ हिकमत उढाण, आमदार घनसावंगी 

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या