घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
हा अपघात इतका भयानक होता की, कंटेनरने अनेक वाहनांना अक्षरशः चिरडलं. त्यामुळे अनेक गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, अपघाताची चौकशी सुरू केली आहे.
अपघातानंतर कंटेनर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तो कंटेनरसह केजहून अंबाजोगाईच्या दिशेने निघाला. मात्र पोलिसांनी तात्काळ हालचाल करत कंटेनर ताब्यात घेतला आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर संतप्त जमावाने कंटेनरला आग लावली असून, या आगीत कंटेनर पूर्णतः जळून खाक झाला आहे.
जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
या संपूर्ण घटनेमुळे केज परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांकडून कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाकडून अपघातस्थळी आवश्यक ती सर्व मदत आणि चौकशी सुरू आहे.
वास्तव मराठी न्यूज चैनल मुळे महाराष्ट्र भरातील तसेच ग्रामीण भागातील ताज्या घडामोडींची माहिती तात्काळ मिळते👍
ReplyDeleteधन्यवाद ! वास्तव न्युज मराठी च्या दर्शक व वाचक वर्गाच्या प्रचंड प्रतिसादामुळे अधिक ऊर्जा मिळते
ReplyDelete