घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी डोमलगाव येथील दोन तरुण गोदावरी नदीवर पोहण्यासाठी गेले होते. पोहणं झाल्यानंतर त्यापैकी एक तरुण बाहेर आला, मात्र दुसरा तरुण पोहत असताना अचानक पाण्यात बुडाला. काही क्षणांतच तो नजरेआड झाला.
घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी गोदावरी नदीकाठ गाठला. बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी गावातील पोहणारे युवक व मासेमारी करणारे नागरिक गोदावरी नदी पात्रात उतरले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह सापडला.
ज्ञानेश्वरच्या मृत्यूने खराद कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण डोमलगाव गावात शोककळा पसरली आहे. ही घटना सर्वांसाठीच हादरवून टाकणारी ठरली आहे. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
Comments
Post a Comment