घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालना व अंबड येथे दोन सरकारी अधिकारी लाचेच्या जाळ्यात

 जालना व अंबडमध्ये भ्रष्टाचाराविरोधात एसीबीची धडक ! दोन वेगवेगळ्या प्रकरणांत सरकारी अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडले 

वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   राज्यातील भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला मोठे यश! जालना व अंबड तालुक्यातील दोन प्रकरणांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकांनी यशस्वी सापळा कारवाई करत दोन वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचारी लोकसेवकांना रंगेहात अटक केली आहे. या कारवायांनी जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली आहे.


प्रकरण 1: ग्रामविकास अधिकाऱ्याची १५,००० रुपयांची लाच घेताना अटक – ACB युनिट जालना

    अंबड तालुक्यातील कुक्कुडगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विष्णु शामराव भानुशे (वय 57) यांना ₹15,000/- लाच घेताना 31 मे 2025 रोजी ACB जालना पथकाने रंगेहात अटक केली.

    तक्रारदाराने आपल्या आईच्या नावावरील मोकळ्या जमिनीची नोंद घेऊन 8अ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी अधिकारी भानुशे यांनी 29 मे रोजी ₹15,000/- लाचेची मागणी केली.

   तक्रारदाराने लगेचच 30 मे रोजी ACB कडे लेखी तक्रार दाखल केली. पडताळणी दरम्यान लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर 31 मे रोजी अंबडमधील शारदा नगर येथे तक्रारदाराच्या राहत्या घरी लाच स्वीकारताना भानुशे यांना पंचासमक्ष अटक करण्यात आली.

 झडतीत मिळालेले पुरावे

₹15,000/- लाच रक्कम, ₹830/- अतिरिक्त रोख रक्कम

Realme कंपनीचा मोबाईल फोन

    या प्रकरणी आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली कार्यरत होते.


प्रकरण 2: घरकुल योजनेत 85,000 रुपयांची लाच मागणाऱ्या दोन अधिकाऱ्यांपैकी एक अटकेत – ACB युनिट छत्रपती संभाजीनगर

    अंबड पंचायत समितीतील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सचिन शालिवाहन कांबळे (वय 31) आणि घरकुल योजनेतील कंत्राटी ऑपरेटर रामदास मंडाळ (वय 35) यांच्याविरोधात १७ लाभार्थ्यांकडून एकूण ₹85,000/- लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

   तक्रारदार व त्यांचे नातेवाईक मिळून १७ लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी (₹70,000/- प्रति लाभार्थी) मंजुरीसाठी आरोपींनी प्रत्येकी ₹5,000/- प्रमाणे एकूण ₹85,000/- लाच मागितली. तक्रारदाराने 30 मे रोजी ACB कार्यालयात तक्रार दिली. पडताळणीअंती लाच मागणी स्पष्ट झाल्यामुळे 31 मे रोजी सापळा कारवाई राबवण्यात आली.

   आरोपी सचिन कांबळे यांनी ₹65,000/- लाच स्वीकारताच त्यांना पंचासमक्ष अटक करण्यात आली. मात्र आरोपी रामदास मंडाळ हा सापडलेला नाही. त्याचा शोध सुरू आहे.

झाडाझडतीत मिळालेले साहित्य

Oppo मोबाईल, घड्याळ, ड्रायव्हिंग लायसन्स

   दोन्ही आरोपींविरुद्ध कलम 7, 7(अ), 12 भ्र.प्र.का. 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या