घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालन्यात मोती तलावात दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू

 दोघेही आईच्या समोरच तलावात उतरले, मात्र काही क्षणातच दोघांचाही बुडून मृत्यू झाला


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   जालना शहरातून एक दुर्दैवी व हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना आज सोमवार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेने संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून सय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

      मृत्यूमुखी पडलेले दोघे भाऊ जुनेद असेफ सय्यद (वय १८) आणि आयान आसिफ सय्यद (वय १५) हे शेर सवार नगर, जुना जालना येथील रहिवासी होते. हे दोघे भावंडे आपल्या मामासह आणि इतर नातेवाईकांसोबत मोती तलाव परिसरात फिरण्यासाठी आले होते. पोहण्याचा मोह आवरता न आल्याने दोघेही आईच्या समोरच तलावात उतरले, मात्र काही क्षणातच दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

   घटनेची माहिती मिळताच चंदनझीरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम सुरू केली. तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.

   मिळालेल्या माहितीनुसार या दोघांच्या घरी अवघ्या चार दिवसांनी त्यांच्या बहिणीचे लग्न होणार होते. घरात चाललेली लगबग क्षणात थांबली आणि आनंदमय वातावरणात दुःखाचे काळे ढग दाटून आले. मृत्यूच्या बातमीने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोती तलाव परिसरात हजारो नागरिकांची गर्दी जमली होती.

    चंदनझीरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय सामान्य रुग्णालयात पाठवले आहेत. पुढील तपास चंदनझीरा पोलीस करीत आहेत.

     हा अपघात केवळ दुःखदच नाही, तर सतर्कतेचा इशाराही देणारा आहे. अशा जलाशयांमध्ये सुरक्षा उपाययोजनांची गरज अधोरेखित करणारी ही घटना आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या