घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा भीषण अपघातात मृत्यू –वाहनाचा चक्काचूर

 बीड जिल्ह्यात शोककळा


वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण

     बीड जिल्ह्याच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आर. टी. देशमुख यांचा सोमवारी दुपारी तुळजापूर - लातूर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांच्या वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, अपघातानंतर त्यांना गंभीर अवस्थेत लातूरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

  प्राप्त माहितीनुसार, पावसामुळे रस्त्याच्या कडेला पाणी साचल्याने गाडी स्लिप झाली आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. यामध्ये आर. टी. देशमुख यांना जबर मार लागून जागीच गंभीर जखम झाली आणि पुढे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातावेळी गाडीत त्यांच्यासोबत असलेले चालक आणि अंगरक्षक हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि हादरवून टाकणारी असून, बीड जिल्ह्यात राजकीय वर्तुळासह सर्वत्र शोककळा पसरली आहे. आर. टी. देशमुख हे एक संयमी, सुसंस्कृत आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जात होते.


    देशमुख यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली. त्यांच्या अभ्यासू आणि सर्वसामान्यांशी जोडलेल्या स्वभावामुळे ते अल्पावधीत लोकप्रिय झाले. त्यानंतर त्यांनी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून काम पाहिले. भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे ते जवळचे सहकारी व कट्टर समर्थक होते.

    ते दीर्घकाळ भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही काळ ते राजकारणापासून दूर गेले होते, मात्र त्यांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले.

    त्यांच्या निधनाने बीड जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक सामाजिक, राजकीय संस्था व कार्यकर्त्यांकडून त्यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

आर. टी. देशमुख यांचे निधन हे केवळ भाजपसाठी नव्हे, तर संपूर्ण बीड जिल्ह्यासाठी अपूरणीय अशी हानी मानली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या