घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
घनसावंगी तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींचा मोठा फटका सहन करत आहेत. सन २०२० पासून अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ, गारपीट, तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे अनेकांचे पीक उत्पादन पूर्णतः बुडाले आहे. शासनाने अशा संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी विविध अनुदान योजना जाहीर केल्या होत्या. मात्र, अनेक पात्र शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ अद्यापही मिळालेला नाही.
यासंदर्भात युवा शेतकरी संघर्ष समिती, घनसावंगी यांनी १७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी, जालना यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तहसीलदार यांचा लॉगिन आयडी वापरून तसेच बनावट VK क्रमांक तयार करून सुमारे २० कोटी रुपयांचा अपहार केला असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांनी संगनमताने अपात्र खात्यांवर रक्कम जमा करून फसवणूक केली. या व्यवहारामुळे अनेक पात्र शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित आहेत. याप्रकरणी अनेक वेळा आंदोलने, निवेदने, मोर्चे व आमरण उपोषण करूनही प्रशासनाने दुर्लक्षच केल्याने संघर्ष समितीने 'भिक मागो' आंदोलनाचे हत्यार उचलले.
या आंदोलनात बाजारपेठेतून शेतकऱ्यांनी भिक मागून 180 रुपये जमा केले व ती रक्कम तहसील कार्यालयात रिकाम्या खुर्चीला अर्पण करून नायब तहसीलदार तोतला यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीमती मेहत्रेवार यांच्याशी फोनवर चर्चा करताना समितीच्या वतीने सूचित करण्यात आले की, जे शेतकरी अद्याप VK नंबरपासून वंचित आहेत, त्यांना त्वरित नंबर देऊन अनुदान वितरित करावे, अन्यथा ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
संघर्ष समितीने मागणी केली आहे की, २०२० पासून आजपर्यंतच्या सर्व अनुदान योजनांची सखोल चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर व शिस्तभंगाची कारवाई व्हावी, वसूल झालेली रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, तसेच 'भिक मागो' आंदोलनातून जमा झालेली रक्कम स्वीकारण्यात यावी. अशा मागण्या केल्या आहेत.
Comments
Post a Comment