ज्ञानराधाच्या ठेवीधारकांसाठी महत्त्वाची सूचना
ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी, बीड: ठेवीधारकांसाठी महत्त्वाची सूचना
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
बीड निबंधक कार्यालयात ठेवीधारकांकडून एफडी दस्तऐवज जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे लक्षात घेऊन सर्व ठेवीधारकांना सूचित करण्यात येत आहे की, गर्दी होऊ नये व ठेवीधारकांना अनावश्यक त्रास होऊ नये म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
सन्माननीय अवसायक (Liquidator) समृत जाधव यांच्या सोबत एल. बी. सावंत यांनी संभाषण केले, ज्यामध्ये त्यांनी विनंती केली की ठेवीधारकांनी आपले एफडी दस्तऐवज प्रत्यक्ष कार्यालयात आणण्याऐवजी ईमेलद्वारे जमा करावेत. या संदर्भात जाधव यांनी समाधानकारक उत्तर दिले असून, आज संध्याकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करण्याचे आश्वासन दिले आहे.
तरी सर्व ठेवीधारकांनी विनाकारण परेशान न होता, आपले दस्तऐवज पीडीएफ फाईलच्या स्वरूपात खालील ईमेल आयडीवर पाठवावे: आपली गैर सोय होवू नये म्हणुन आपण समक्ष उपस्थित न राहता ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या ई-मेल dnyanradhaliquidator@gmail.com वर आपला अर्ज पाठविण्यात यावा.
वरील बाब सर्व ठेवीधारकांनी गांभीर्याने घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
Ashok mandot
ReplyDelete