घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
जालना जिल्ह्यातील शहागड व बदनापूर या दोन ठिकाणी एस एस टी पथकाने ३ लाख ५८ हजार रुपयेची रोकड आज पकडलीय. आज अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस स्टेशन हद्दीत एस एस टी पाँईट शहागड येथे नाकबंदी दरम्यान १ लाख ८८ हजाराची रोकड पकडली.
सदरची १ लाख ८८ हजाराची रोकड रक्कम ही टाटा कंपनीची कार क्र एम एच ०१-सीआर १२६ मधील मालक नामे मंदार रावसाहेब वरपे (रा आळेफाटा ता जुन्नर जि पुणे) यांच्याकडून जप्त करण्यात आलेली आहे. एफएसटी पथक यांना बोलवून पुढील कारवाईसाठी रक्कम त्यांच्या ताब्यात गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी दिली आहे.
दुसऱ्या घटनेत बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरुडी येथे चेक पोस्ट सुरु केलेले आहे, या चेक पोस्ट वर पोलीस कर्मचारी फेरोज खान, पोलिस कर्मचारी कनाके,राजेंद्र बोकन, सी. डी. गायकवाड, जगन्नाथ उगले हे १३ नोव्हेंबर रोजी दुपारी कर्तव्य बजावत असतांना संभाजीनगर कडून एम एच -२० -सी एस या कार ची एस एस टी पथकाने तपासणी केली असता वाहनामध्ये १ लाख ७० हजार रुपये चेक पोस्ट वर जप्त केले.
Chacha 💪🏻🌍😎
ReplyDeleteGood job 😎🎉
ReplyDelete