घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

शेतकऱ्यांनी अनुदानासाठी ई-केवायसी करावी..! तुम्ही तुमच्या मोबाईलवरुनही ई केवायसी करु शकता

शेतकऱ्यांनी अनुदानासाठी ई-केवायसी करावी..! तुम्ही तुमच्या मोबाईलवरुनही ई केवायसी करु शकता

खरीप २०२३ मधील कापूस व सोयाबीनचे अनुदान




वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण

    सन २०२३ च्या खरीप हंगामात ई-पीक अॅपवर कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले. ते मिळण्यासाठी ई-केवायसी करने गरजेचे आहे. ई केवायसी न केल्यास अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरुनही ई केवायसी करु शकता.

   कापूस, सोयाबीनच्या नोंदणीकृत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ०.२० हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १ हजार रुपये आणि ०.२० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रतिहेक्टर ५ हजार रुपये अर्थसहाय्य दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार यासाठी मध्यस्थ, दलालांचा आधार घेऊ नका शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व नाहरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत संकलित करून शासनाने महाआयटीकडून तयार केलेल्या www.scagridbt.mohait.org.in या वेबपोर्टलवर माहिती भरली जात आहे. त्यासाठी आधार ई केवायशी करणेसाठी कोणत्याही मध्यस्थांची गरज नाही. आर्थिक सहाय्य पात्र लाभार्थ्यांच्या आधार-सीड बँक खात्यांत जमा होते याची खात्री करण्यासाठी राज्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे.
    शेतकऱ्यांनी नजीकच्या सेतू सुविधा केंद्रावर जाऊन आपले ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यानंतरच एकवेळ अनुदान वितरणासाठी शेतकरी पात्र ठरतील. २७ सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेय.

मोबाईलवर तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरुनही खालील लिंक वर जाऊन ई केवायसी करु शकता. www.scagridbt.mohait.org.in

लिंक ला काही काळ तांत्रीक अडचण येऊ शकते...

सर्व शेतकऱ्यांना सुचित करण्यात येते की ई पिक पहाणी नुसार कापूस व सोयाबीन अनुदान पात्र शेतकऱ्यांनी वरील लिंक वर सर्व शेतकऱ्यांना स्वतः eKYC करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकून इ केवायसी करून घ्यावी.

इ केवायसी करण्यासाठी या टॅबवर क्लिक करून पुढे आधार क्रमांक टाकावा व ओटीपी द्वारे केवायसी करून घ्यावी..
https://scagridbt.mahait.org/Beneficiary_Status/Beneficiary



महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांच्याकडून सोयाबीन व कापूस अनुदान ई-केवायसी बाबत महत्वाची सूचना जारी केल्यात...

- जे शेतकरी "नमो शेतकरी महासन्मान निधि योजना" मध्ये नोंदणी केलेले आहेत त्यांना या योजने मध्ये eKYC करण्याची आवश्यकता नाही त्यांना डायरेक्ट लाभ हस्तांतरण करण्यात येणार आहे.

- फक्त कृषि विभागाने प्रसिद्ध केलेल्या यादीतील शेतकऱ्यांनाच Ekyc करावी लागेल त्याशिवाय त्यांना लाभ हस्तांतरण करता येणार नाही.

- ज्या शेतकऱ्यांच्या आधार शी मोबाइल क्रमांक लिंक नाही त्यांनी आपल्या जवळील महा ई सेवा केंद्र वरती जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आपली KYC पूर्ण करून घ्यावी.

- या योजनेच्या अनुषंगाने बऱ्याच फसव्या लिंक पाठविल्या जाऊ शकतात त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला आधार क्रमांक आणि ओटीपी हा कोणत्याही अनोळखी व्यक्ति सोबत शेअर करू नये आणि याबाबत शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेय.




Comments

  1. सविता रामेशवरतौर

    ReplyDelete
  2. पल्लवी रामेश्वर तौर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या