ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
३२ वर्षीय तक्रारदाराच्या आजोबांच्या नावे असलेले रास्त भाव दुकान क्र. २९, मौजे काटेपिंपळगाव, ता. गंगापूर, याचे प्राधिकारपत्र निलंबित झाले होते. हे निलंबन मागे घेण्यासाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी कांचन कांबळे यांनी ७०,००० रुपयांची लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत, दिनांक १२ जून रोजी ला.प्र.वि. कार्यालयात तक्रार दाखल केली होती.
दिनांक १३ जून रोजी, शासकीय पंचांच्या उपस्थितीत तक्रारदाराने आरोपी अधिकाऱ्याशी पुन्हा संपर्क साधला असता, तडजोडीअंती स्वतःसाठी १५,००० आणि जिल्हा पुरवठा अधिकारीसाठी २५,००० अशी एकूण ४०,००० रुपयांची लाच घेण्यास कांचन कांबळे यांनी कबुली दिली.
त्यानुसार, छत्रपती संभाजी नगर विभागाकडून दिनांक १४ जून रोजी वस्तू व सेवा कर भवनच्या गेटजवळ सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ४०,००० रुपये लाच स्वीकारताना कांचन कांबळे यांना पंचांच्या साक्षीने रंगेहाथ अटक करण्यात आली.
कांचन कांबळे यांच्या अंगझडतीत iPhone 13 Pro, इतर एक मोबाईल फोन, पर्समध्ये ३,००० रुपये, तसेच गाडीच्या डिकीत लाचेची ४०,००० रुपयांची रक्कम सापडली. दोन्ही मोबाईल जप्त करून त्यांच्या फॉरेन्सिक तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे.
या प्रकरणी श्रीमती कांबळे यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९९८ अंतर्गत कलम ७ व ७ अ प्रमाणे पोलीस ठाणे वेदांत नगर, छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाई सापळा अधिकारी: वाल्मीक कोरे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., सहायक सापळा अधिकारी: गोरखनाथ गांगुर्डे, पो.उप.अधिक्षक, सापळा पथकात पोह. राजेंद्र जोशी, पोअं. डोंगर दिवे, सीएन बागुल, म.पोहे. पुष्पा दराडे, अशा कुंटे यांचा समावेश होता.
Comments
Post a Comment