ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

Image
  व्यसनाचा भीषण शेवट- कुटुंबातिल तिघांचा झाला दुर्दैवी अंत.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      एक अत्यंत दुर्दैवी व अंगाला शहारे आणणारी हृदयद्रावक घटना समोर आलीय ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट झाला असून कर्जबाजारीपणामुळे तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही आत्महत्या करत कुटुंबाचा अंत केला.      धाराशिव जिल्ह्यातील बावी (ता. कळंब) या गावात ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या लक्ष्मण जाधव या तरुण ट्रॅक्टर चालकाने आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात आहे. आर्थिक अडचणीतून दुर्दैवी पाऊल    मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण जाधव (वय अंदाजे ३०) हा गावातील कष्टकरी ट्रॅक्टर चालक होता. काही महिन्यांपासून त्याला ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमचं अतिशय व्यसन जडलं होतं. सुरूवातीला कमी रकमेने खेळत असताना काहीवेळा जिंकल्यामुळे त्याला त्या गेमची सवय लागली. मात्र...

जालन्यात भ्रष्टाचाराचा लेखाजोखा उघडकीस? संबंधित अधिकाऱ्यांची नावे आणि गावांची यादी व्हायरल

अंबड व घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात हजारोचा घोटाळा ?


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात शासनाच्या विविध निर्णयांनुसार शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. मात्र या अनुदान वाटपात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघड झालेय, या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांचं नांव पुढे आलं आहे. अनेक गावांमध्ये दुबार नावे, अतिप्रदान रक्कम, आणि बनावट दस्तऐवजांच्या आधारे अनुदान वाटप केल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत तशी यादी व रक्कम यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दिसून येत आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या यादीनुसार शासन निर्णयानुसार मिळालेले अनुदान (अंशतः)

शासन निर्णय तालुका मंजूर अनुदान स्वीकृत अनुदान

17.11.2022 अंबड ₹112.63 कोटी ₹97.31 कोटी

 घनसावंगी ₹70.27 कोटी ₹77.77 कोटी

20.06.2023 अंबड ₹11.27 कोटी ₹11.63 कोटी

 घनसावंगी ₹11.77 कोटी ₹113.32 कोटी

31.01.2024 अंबड ₹28.62 लाख ₹25.03 लाख

 घनसावंगी ₹95.72 कोटी ₹93.10 कोटी

29.02.2024 अंबड ₹11.09 कोटी ₹110.60 कोटी

तपासणीस आलेली खातेदारांची संख्या एकूण खातेदार: 1,79,208

तपासलेले खाते: 3,08,671 (काही दुबार, त्रुटीयुक्त)

एकूण अपहार व भरपाई तपशील

तालुका अपहारित रक्कम भरणा केलेली रक्कम अतिप्रदान रक्कम दुबार रक्कम

अंबड ₹14.96 कोटी ₹15.93 कोटी ₹96.84 लाख ₹3.20 कोटी

घनसावंगी ₹19.03 कोटी ₹9.09 कोटी ₹9.94 कोटी ₹2.54 कोटी

एकूण ₹34.97 कोटी ₹25.43 कोटी ₹10.06 कोटी ₹5.74 कोटी

 रु. 25 लाखांपेक्षा अधिक अपहार करणारे अधिकारी - अंबड तालुका:

अधिकारी अपहारित रक्कम (₹) संबंधित गावे अंबड तालुका 

गणेश मिसाळ ₹1.83 कोटी दहीगव्हाण खु., बेलगाव, सुखापुरी, कुक्कडगांव

कैलास धारे ₹1.73 कोटी पिंपरखेडा खु., डावरगाव, झोडेगाव, शहागड, महाकाळा इ.

विठ्ठल गाडेकर ₹1.58 कोटी अंबड, पारनेर, गोविंदपूर

बाळु सानप ₹1.33 कोटी डोमलगाव, गहीणीनाथ नगर, बळेगाव, गोरी

पवन सुलाने ₹1.18 कोटी लोणार भायगांव, कर्जत, धनगर पिंपळगांव

शिवाजी ठालके ₹1.03 कोटी दाढेगांव, मठ तांडा, पि. सिरसगाव

कल्याण बमनावत ₹97.74 लाख साष्ट पिंपळगांव, निहालसिंगवाडी

सुनिल सोरमारे ₹75.56 लाख शहापुर, बारसवाडा

अल्ताफ शेख ₹45.53 लाख शहापुर, रेवलगाव

चंद्रकांत खिल्लारे ₹41.68 लाख सारंगपूर, झिरपी, वसंतनगर

रामेश्वर जाधव ₹33.02 लाख आलमगांव, बदापुर, रोहीलागड

डी. जी. कुरेवाड ₹26.26 लाख ईश्वरनगर, झिरपी तांडा, बनटाकळी

किरण जाधव ₹26.25 लाख दुधपुरी, काटखेडा, गौदी

रमेश कांबळे ₹25.40 लाख चंदनापुरी, आंबेरी, दहयाळा

घनसावंगी तालुक्यातील अपहार करणारे अधिकारी अधिकारी अपहारित रक्कम (₹) गावांची नावे

वी.पी. हरणे (कृषी सहायक) ₹1.72 कोटी रखना, रवन्ना, निपाणी पिंपळगांव

प्रविण शिनगारे ₹1.30 कोटी घनसावंगी

मयुर सुलताने (कृषी सहायक) ₹1.01 कोटी शिंदेवडगांव, करडगांव

बी. आर. भुसारे ₹87.08 लाख ढाकेफळ, बहीरेगांव

डी. एल. लहामगे ₹61.97 लाख बोलेगांव, भदेगांव

एम. टी. रुपनर ₹44.64 लाख गुरुपिंप्री

राजु शेख ₹36.02 लाख निपाणी पिंपळगांव, तिर्थपुरी

व्ही. बी. शिनगारे ₹34.59 लाख जिरडगांव, बोलेगांव

एस. एस. कुलकर्णी ₹33.02 लाख पारडगाव

जे. यु. खरजुले ₹32.87 लाख गुरुपिंप्री

ए. जी. कोल्हे ₹25.98 लाख रामगव्हाण खु.

टीप: कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांची अजून खुलासा व सुनावणी बाकी आहे. 

 सार्वजनिक मागणी

   हा मोठा आर्थिक घोटाळा उघड होत असून संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा व्हावी अशी जनतेची मागणी आहे. संबंधित विभागांनी तत्काळ कारवाई करावी व शेतकऱ्यांच्या हक्काच्या निधीची पुनर्बचत व्हावी. 

मात्र या व्हायरल यादीची वास्तव न्युज मराठी पुष्टी करत नाही

५ कोटी ७४ लाख वसुल केले

    जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा अंतिम अहवाल चौकशी समितीने जालना जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. समितीच्या तपासात २६ कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला असून अंबड तालुक्यातील १५ तर घनसावंगी तालुक्यातील ११ कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. दरम्यान, या ३४ कोटी ९७ लाख रुपयांपैकी आतापर्यंत एकूण ५ कोटी ७४ लाख रुपयांची वसुली झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ८ सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पूर्ण केल्यानंतर समितीने आपला अहवाल आज मंगळवारी (दि. १०) जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. या प्रकरणी चौकशी समितीने ७९ कोटींची रक्कम अक्षेपित काढली होती. त्यापैकी ७२ कोटी रुपयांची समितीने चौकशी केली असून ३४ कोटी ९७ लाख रुपयांची रक्कम अपहारीत असल्याचे या चौकशीत निष्पन्न झालं असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

यांच्यावर ठेवला ठपका..

२५ लाखांपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याप्रकरणी चौकशी समितीने ठपका ठेवलेले कृषी सहायक, ग्राम महसुल अधिकाऱ्यांचा तपशील आणि कंसात अपहार झालेली रक्कम पुढील प्रमाणे आहे. 

अंबड तालुका

गणेश मिसाळ (१ कोटी ८३ लाख ५६ हजार ३९९ रू.), कैलास घारे (१ कोटी ७३ लाख २६ हजार १७१ रू.), विठ्ठल गाडेकर (१ कोटी ५७ लाख ९८ हजार ९०३ रू.), बाळु सानप (१ कोटी ३३ लाख ५७ हजार ७९७ रू.), पवन सुलाने (१ कोटी १८ लाख ५४ हजार ८७८ रू.), शिवाजी ढालके (१ कोटी ०३ लाख २५ हजार ५३८ रू.), कल्याण बमनावत (९७ लाख ७४ हजार २५६ रू.), सुनिल सोरमारे (७५ लाख ५६ हजार ४३२ रू.), अल्ताफ शेख (४५ लाख ५३ हजार ६२४ रू.), मोहित गोषीक (४२ लाख ७४ हजार ८१३ रू.), चंद्रकांत खिल्लारे (४१ लाख ६८ हजार ६४५ रू.), रामेश्वर जाधव (३३ लाख ०२ हजार २३ रू.), डी. जी. कुरेवाड (२६ लाख २६ हजार ५२२ रू.), किरण जाधव (२६ लाख २५ हजार ३०४ रू.), रमेश कांबळे (२५ लाख ४० हजार ३१ रू.),

घनसावंगी तालुका 

   बी. पी. हरणे (१ कोटी ७२ लाख ५७ हजार ५३३ रू.), प्रविण शिनगारे (१ कोटी ३० लाख २७ हजार २६६ रू.), मयुर सुलताने (१ कोटी ०१ लाख १० हजार ३९७ रू.), बी. आर. भुसारे (८७ लाख ०८ हजार ४८२ रू.), डी. एल. लहामगे (६१ लाख ९७ हजार ३९९ रू.), एम.टी. रूपनर (४४ लाख ६४ हजार ५६८ रू.), राजु शेख (३६ लाख ०२ हजार २३७ रू.), व्ही. बी. शिनगारे (३४ लाख ५९ हजार ८४ रू.), एस. एस. कुलकर्णी (३३ लाख ०२ हजार ७३८ रू.), श्रीमती जे. यु. खरजुले (३२ लाख ८७ हजार १५१ रू.), ए. जी. कोल्हे (२५ लाख ९८ हजार ४५३ रू.)

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!