ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
जालन्यातील सिरसवाडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, अंगणात खेळत असताना पाण्याने भरलेल्या बादलीत पडून 1 वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मृत बालकाचे नाव शिव अनिल ढगे (वय 1 वर्ष) असे आहे. विशेष म्हणजे शिवचा वाढदिवस अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला होता, मात्र त्याआधीच काळाने त्याच्यावर घाला घातला.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल ढगे यांचा मुलगा शिव आपल्या घराच्या अंगणात खेळत होता. नेहमीप्रमाणे त्याची आई त्याला अंगणात सोडून घरकामात व्यस्त होती. घरातील इतर सदस्यही आपापल्या कामांत गुंतले होते. दरम्यान, अंगणात एक मोठी बादली पाण्याने भरून ठेवली होती. खेळता-खेळता शिव त्या बादलीजवळ गेला आणि बादलीला धरून उभा राहिला. पाण्याशी खेळत असतानाच अचानक तोल जाऊन तो बादलीत पडला. काही वेळातच श्वास कोंडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
जेव्हा घरच्यांनी त्याला पाहिलं, तेव्हा तो बादलीत बुडालेल्या अवस्थेत आढळून आला. तातडीने त्याला उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ही घटना समजताच संपूर्ण सिरसवाडी परिसरात शोककळा पसरली असून, वाढदिवसाच्या आदल्या दिवशी घडलेली ही दुर्घटना गावकऱ्यांच्या काळजाला चटका लावणारी ठरली आहे.
या घटनेमुळे लहान मुलांना घराच्या परिसरात एकटं सोडताना किती दक्षता घेणं आवश्यक आहे, याचा पुनः एकदा प्रत्यय आला आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून याप्रकरणी आवश्यक ती चौकशी सुरू आहे.
Comments
Post a Comment