घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्यूज, ओमप्रकाश उढाण
"पोलीस हे जनतेचे खरे सेवक आहेत," हे केवळ पुस्तकात वाचण्यापुरते राहिलेले वाक्य काही अपवादात्मक अधिकाऱ्यांच्या कृतीतून वास्तवात साकारताना दिसते. परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींदरसिंह संतोषसिंह परदेशी हे असेच एक उदाहरण ठरले आहेत. त्यांनी शनिवारी ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे पिंगळी या ग्रामीण भागाला अचानक भेट देत स्थानिक शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
ही भेट कोणत्याही औपचारिक कार्यक्रमाशिवाय पार पडली. श्री. परदेशी यांनी थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांशी गप्पा मारल्या, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि शेतीचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. त्यांच्या या दौऱ्यात ताडकळस पोलीस ठाण्याचे ठाणेदार सपोनि गजानन मोरे देखील उपस्थित होते. पोलीस अधीक्षकांनी शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन शेताची पाहणी केली आणि त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला.
या भेटीत त्यांनी ग्रामीण जीवनाचा अनुभवही घेतला. शेतातील विहिरीत पोहण्याचा आनंद घेतला, तर दुसरीकडे जांभूळ, भुईमूग शेंगा, पपई यांचा आस्वाद घेत शेतकऱ्यांशी आपुलकीची नाळ जोडली. विशेष म्हणजे, शेतात चुलीवर बनवलेल्या गरमागरम चहाचा त्यांनी आस्वाद घेतला. हा अनुभव केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर अधिकाऱ्यांनाही विशेष आनंददायी वाटला.
या अनपेक्षित भेटीमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांनी आपले मन मोकळे करताना सांगितले, “अशा प्रकारे वरिष्ठ अधिकारी आमच्याकडे येऊन आमच्या शेतात बसतात, संवाद साधतात, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. अशा भेटी आमच्या समस्या मांडण्यासाठी आणि त्या समजून घेण्यासाठी मोठी संधी ठरतात.”
पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांची ही भेट केवळ औपचारिक दौऱ्यापुरती मर्यादित न राहता, खऱ्या अर्थाने जनतेशी आपुलकीने जोडणारी ठरली. ग्रामीण भागातील नागरिकांचे दुःख समजून घेणारे आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे अधिकारी म्हणून त्यांचे हे पाऊल इतर अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
शहरात बसून आदेश देण्यापेक्षा, प्रत्यक्ष शेती व शेतकऱ्यांशी संवाद साधणाऱ्या या अधिकाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण जीवनाशी नाळ जुळवत जनतेचा विश्वास जिंकणाऱ्या या भेटीने 'पोलीस आणि जनता' यांच्यातील अंतर खूपच कमी झाले आहे.
Abhinandan pardeshi sir
ReplyDelete