पंतप्रधान मोदी आदमपूर एअरबेसवर: पाकिस्तानच्या 'स्वप्नातील हल्ल्याला' ठोस उत्तर! फोटोंसह

 अदमपूर, पंजाब आजच्या विशेष दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदमपूर एअरबेसला दिली हजेरी


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   ज्या आदमपूर एअरबेसवर पाकिस्तानने आपल्या सोशल मिडियावर 'स्वप्नात' हल्ला केल्याची खोटी बातमी मोठ्या जोमाने पसरवली होती, त्या ठिकाणी आज प्रत्यक्षात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १३ मे मंगळवार रोजी हजेरी लावून वस्तुस्थिती समोर आणली.

    पंतप्रधान मोदींनी केवळ एअरबेसला भेट दिली नाही, तर भारतीय वायूदलाच्या जवानांमध्ये मिसळले, त्यांना सॅल्यूट केला आणि त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गारही काढले. सैनिकांमध्ये जोश निर्माण करणाऱ्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी अत्याधुनिक लढाऊ विमाने व संरक्षण उपकरणांची माहिती घेतली.

     त्यांनी केवळ प्रत्यक्ष मैदानात जाऊन जवानांचे मनोबल वाढवले नाही, तर पाकिस्तानच्या दिशाभूल करणाऱ्या सोशल मीडिया प्रोपगंडालाही प्रत्यक्ष कृतीने उत्तर दिलं.

  पाकिस्तानच्या बनावट हल्ल्याच्या कल्पनेपेक्षा हजारपटीने वेगाने, मोदी आपल्या पुढील कार्यक्रमासाठी तिथून रवाना झाले – शांत, ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण.

   ही घटना स्पष्टपणे दर्शवते की, सोशल मिडियावर खोटं पसरवणं वेगळं आणि भारतीय सैन्य व नेतृत्वाचं वास्तव वेगळं असतं – आणि त्याचं उत्तर 'कृतीतून' दिलं जातं, शब्दांनी नाही. राष्ट्र सुरक्षित हातात आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.




Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!