ऑपरेशन सिंदूर: भारताच्या दोन रणरागिणींचा दहशतवादाविरोधात ऐतिहासिक विजय

 कोण आहेत ऑपरेशन सिंदुर ची माहिती देणाऱ्या रणरागिणी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग


विशेष रिपोर्ट वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    ७ मे २०२५ रोजी जगभरात एक अभिमानास्पद क्षण घडला -जेव्हा भारतीय लष्कर आणि हवाई दलाने संयुक्तपणे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अत्यंत अचूक आणि परिणामकारक हल्ला केला. 'ऑपरेशन सिंदूर' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मिशनची माहिती जगापुढे आणली ती दोन शूर महिला अधिकारी - कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी !

    हा केवळ एक हल्ला नव्हता, तर भारतीय स्त्रीशक्तीची आणि धर्मनिरपेक्षतेची भव्य आणि जगाला थक्क करणारी घोषणा होती.


'ऑपरेशन सिंदूर' बद्दल थोडक्यात:

    २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या मुरीदके आणि बहावलपूर येथील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या महत्त्वाच्या केंद्रांवर निशाणा साधण्यात आला. सकाळी १:०५ ते १:३० दरम्यान झालेल्या हवाई आणि सर्जिकल स्ट्राईकमुळे या अड्ड्यांचे प्रचंड नुकसान झाले.


"ऑपरेशन सिंदूर": इतिहास घडवणारी वर्दीतली भारतीय स्त्री

    भारताच्या लष्करी इतिहासात पहिल्यांदाच एका मुस्लिम महिला अधिकारी, एका हिंदू महिला अधिकारी आणि एका काश्मिरी पंडित अधिकाऱ्याने एकत्र येऊन दहशतवादविरुद्धची कारवाई जगासमोर मांडली.

    हे केवळ एक लष्करी मोहीम नव्हते; ते भारतीय स्त्रीशक्तीचे, धर्मनिरपेक्षतेचे आणि राष्ट्रभक्तीचे सडेतोड प्रत्युत्तर ठरले. विविध धर्मांतील महिला अधिकारी एकत्र येऊन देशरक्षणाच्या पवित्र कार्यात सहभागी झाल्या, हे भारताच्या सामाजिक एकतेचे आणि लष्करातील बदलत्या भूमिकेचे ठळक उदाहरण ठरले आहे.

   आज जगभर भारताकडे नव्या नजरेने पाहिले जाते आहे. भारत आता केवळ शब्दांनी नव्हे, तर कृतीने उत्तर देतोय- आणि या कृतीच्या केंद्रस्थानी आहे "ती", वर्दीतली भारतीय स्त्री. तिच्या धैर्याने, शौर्याने आणि निष्ठेने भारताने जागतिक व्यासपीठावर एक ठळक छाप उमटवली आहे.

मुरीदके का होता लक्ष्य?

   मुरीदके हे लाहोरजवळील शहर लष्कर-ए-तय्यबा आणि जमात-उद-दावाचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. याठिकाणी वर्षातून एकदा हजारो अतिरेक्यांचे संमेलन भरते, जिथे भारतविरोधी जिहादी विचारधारा पसरवली जाते. या ठिकाणी हाफिज सईदसारखे दहशतवादी थेट उपस्थित राहतात आणि भारताविरुद्ध विष पेरतात.

कर्नल सोफिया कुरेशी: भारतीय लष्करातील मानाचा तुरा

शिक्षण: बायोकेमिस्ट्री

१९९९ साली भारतीय लष्करात प्रवेश

'एक्सरसाइज फोर्स १८' मध्ये भारताचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी

सध्या मुझफ्फराबादच्या शवाई नालाह कॅम्पवर जबाबदारी

गेल्या वर्षभरात झालेल्या सोनमर्ग, गुलमर्ग आणि पहलगाम हल्ल्यांशी संबंधित दहशतवाद्यांचा मागोवा घेणारी महत्त्वाची सूत्रधार


विंग कमांडर व्योमिका सिंग: आकाशातली वाघीण

शिक्षण: इंजिनिअरिंग

डिसेंबर २००४ मध्ये भारतीय हवाई दलात नियुक्त

२५०० तासांपेक्षा जास्त उड्डाण अनुभव

चिता आणि चेतक हेलिकॉप्टर्सवर मास्टर

ईशान्य भारत आणि काश्मीरसारख्या कठीण भागांत विविध महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभाग


एक शक्तिशाली संदेश

   या दोन अधिकारी महिलांनी मिळून जगाला भारताचा एक नवा चेहरा दाखवला - जिथे धर्माच्या पलीकडे जात देशसेवा आणि मानवतेची सर्वोच्चता असते.

   "धर्म पुछा..." या विषारी प्रश्नावर त्यांनी आपल्या कृतीतून भक्कम उत्तर दिलं. भारताने केवळ पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर घाव घातला नाही तर देशातील फुटीर प्रवृत्तींचेही तोंड बंद केले. त्यांचा संयुक्त फोटो आज हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आणि भारतीय सत्ताशक्तीचे जिवंत प्रतीक बनला आहे.

   ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक लष्करी यश नाही, तर ते भारताच्या स्त्रीशक्तीचे, धर्मनिरपेक्षतेचे आणि संकल्पशक्तीचे स्फूर्तीदायक उदाहरण आहे. भारताच्या भविष्यासाठी हा एक दृष्टीकोन देणारा क्षण आहे - जिथे देशभक्ती, बंधुता आणि सशक्त नेतृत्व एकत्र येते.

   "ऑपरेशन सिंदूर: भारताच्या रणरागिणींचा पाकिस्तानवर निर्णायक घाव! कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादी अड्ड्यांचा नाश!

 भारताचा अभिमान !

   ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या वीर रणरागिणी - कर्नल सोफिया कुरेशी (भारतीय लष्कर) आणि विंग कमांडर व्योमिका सिंग (भारतीय हवाई दल) यांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर तडाखेबाज हल्ला करत भारताला अभूतपूर्व विजय मिळवून दिला!

धर्म नाही, देश महत्त्वाचा - हीच खरी भारतीय ओळख!


जय हिंद ! जय भारत ! वंदे मातरम !

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!