७ तारखेला देशभरात मॉक ड्रिल; हवाई हल्ला अलर्टसाठी सायरन वाजणार

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    नवी दिल्ली: येत्या ७ तारखेला, बुधवारी संपूर्ण देशात एक मोठ्या प्रमाणावर मॉक ड्रिल आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत सर्व राज्य सरकारांना, सुरक्षायंत्रणांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या दिवशी देशभरात एकाचवेळी हवाई हल्ल्याचा अलर्ट देणारा सायरन वाजवण्यात येणार आहे.अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

   भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही दक्षता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात जर युद्धजन्य परिस्थिती उद्भवली, तर नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका टाळण्यासाठी ही मॉक ड्रिल अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

    या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद देण्याची तयारी निर्माण करणे आणि स्वसंरक्षणाचे प्राथमिक प्रशिक्षण देणे. या अंतर्गत शाळा, महाविद्यालये, कार्यालये, बाजारपेठा, रहिवासी भाग अशा विविध ठिकाणी लोकांना योग्य ती माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे.

   गृहमंत्रालयाने नागरिकांना शांत राहण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. मॉक ड्रिलदरम्यान मिळालेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे अत्यावश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

    यावेळी स्थानिक प्रशासन, पोलीस दल, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांचा सक्रिय सहभाग असणार आहे.


Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!