पालकांनो सावधान! खासगी शाळेच्या संचालकाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

 पालक संतप्त, शाळेबाहेर आक्रमक आंदोलन


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   एका नामांकित खासगी शाळेच्या संचालकाचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित होत असतानाच, संतप्त पालकांनी शाळेबाहेर आक्रमक आंदोलन छेडले. हा प्रकार कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात घडल्याची माहिती समोर आलीय.

   मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शाळेबाहेर मोठ्या प्रमाणावर पालक जमा झाले असून त्यांनी संचालकाच्या तात्काळ निलंबनाची आणि या कृत्याबाबत कठोर कायदेशीर कारवाईची जोरदार मागणी केली आहे.

   या प्रकरणाची दखल घेत शिवसेना (ठाकरे गट) कल्याण विभागाच्या पदाधिकारी आशा रसाळ यांनी तात्काळ शाळेच्या ठिकाणी भेट देऊन पालकांशी संवाद साधला. त्यांनी पालकांच्या भावना जाणून घेत प्रशासनाकडे संबंधित संचालकावर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली.

  दरम्यान, पालकांनी कोळशेवाडी पोलीस ठाणे गाठून संचालकाविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पोलीस याप्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधित व्हिडिओची सत्यता आणि संपूर्ण घटना तपासण्यात येत आहे.

   पालकांनीही यापुढे शाळा निवडताना अधिक जागरूक राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. खासगी शाळांमध्ये वाढती स्पर्धा आणि व्यवस्थापनातील पारदर्शकतेअभावी अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाची जबाबदारीही वाढली आहे.

   या प्रकरणावर प्रशासन काय कारवाई करते आणि दोषींना शिक्षा होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!