घनसावंगी तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर : युवक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
घनसावंगी तालुक्यात दि ५ मे सोमवारी दुपारनंतर अनेक गावात अचानक प्रचांड वादळी वारा झाला यात एक युवक गंभीर जखमी झाला त्याला जालन्याला हलवले आहे.
तालुक्यातील बाणेगाव येथे रविवारी दुपारी अचानक आलेल्या प्रचंड वादळी वाऱ्यामुळे कृष्णा उद्धव मस्के (रा. बाणेगाव) हा युवक गंभीर जखमी झाला. गावात जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी जाहिरातीचे फलक उडाले. यातील एक फलक कृष्णा मस्के यांच्या डोक्यावर आदळल्याने त्याला गंभीर दुखापत झाली.
![]() |
जखमी कृष्णा मस्के |
या अपघातानंतर कृष्णा मस्के यांच्या कानातून रक्तस्राव सुरू झाला तसेच त्याला रक्ताची उलटीही झाली. गावकऱ्यांच्या मदतीने त्याला तात्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला जालना येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वादळी वाऱ्यामुळे इतरही ठिकाणी किरकोळ नुकसान झाले आहे.
Comments
Post a Comment