जालना पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तरुणाचा दुर्दैवी प्रयत्न !

  प्लॉटींगच्या वादातून पोलिसांवर खोट्या गुन्ह्याचा आरोप


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    जालना जिल्ह्यातील पोलीस व्यवस्थेवर गंभीर आरोप करत एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज घडली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

     परमेश्वर कदम असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो जालना तालुक्यातील रेवगाव येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेवगावमध्ये प्लॉटच्या मालकीवरून परमेश्वर कदम यांचा गावातील एका व्यक्तीसोबत वाद सुरू आहे. या वादात समोरील व्यक्तीच्या सांगण्यावरून पोलिसांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप परमेश्वर कदम याच्या नातवाइकांनी केला आहे.


    पोलिसांनी विनाकारण गुन्हा दाखल करून मानसिक त्रास दिल्यामुळेच परमेश्वर कदम यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचं नातवाइकांचे म्हणणे आहे. विष प्राशन केल्यानंतर त्यांना तातडीने जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजते.

    या प्रकारामुळे जिल्हा पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याप्रकरणी सखोल चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा तपास सुरू असून, पोलिसांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!