धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात: दोनजण ठार तर पाच जखमी

हैद्राबादहून शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    हैद्राराबादहून शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून धुळे-सोलापूर महामार्गावर बारसवाडा फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या विना नंबर प्लेटच्या हायवाने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात परप्रांतीय दांपत्य जागीच ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, कारमधील मृतदेह व जखमींना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढावे लागले.

  हैद्राबादहून शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. हैदराबाद येथील जी. रामू (वय ४४) आणि जी. माधुरी (वय ४०) हे दांपत्य या अपघातात जागीच ठार झाले. तर श्रीवाणी (वय ४०), अनुषा (वय १६), मेघना (वय १३), ऋषिका (वय ८) आणि नागेश्वर राव (वय ४४) हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

   हैद्राबादहून रविवारी दुपारी १२ वाजता शिर्डीकडे जाण्यासाठी निघालेल्या किया कॅरेन्स (क्रमांक टीजी ०८ क्यू ०५५८) कारमध्ये हे सातजण प्रवास करत होते. बारसवाडा फाट्याजवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्या विना नंबरच्या हायवाने त्यांच्या कारला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडकेनंतर कारचा अक्षरशः चुराडा झाला.

 हा अपघात होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. महामार्ग क्रमांक ५२ वरील १०३३ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनीही त्वरित घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

   जी माधुरी हीचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात तर, जी रामू यांचे शवविच्छेदन पाचोड उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!