घनसावंगी तहसील कार्यालयात शेतरस्ते व पाणंद रस्त्यांच्या अतिक्रमणावर तडजोडीने निर्णय

 तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - तहसीलदार योगिता खटावकर 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या परिपत्रकानुसार तहसील कार्यालय घनसावंगी येथे दिनांक ९ मे २०२५ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:०० या वेळेत सस्ती अदालत आयोजित करण्यात आली आहे. या अदालतीमध्ये शेतरस्ते व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढली जाणार आहेत. अशी माहिती घनसावंगी च्या तहसीलदार योगिता खटावकर यांनी दिली.

     छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये शेतरस्ते व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्याने सामान्य शेतकऱ्यांना तात्काळ व न्यायालयीन खर्च वाचवणारा न्याय मिळवून देण्यासाठी सस्ती अदालतींचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


या उपक्रमाअंतर्गत तालुकास्तरावर खालील समिती कार्यरत असेल

अध्यक्ष : तहसीलदार, सह-अध्यक्ष : गट विकास अधिकारी,सदस्य : उपअधीक्षक भूमी अभिलेख, उपअभियंता (बांधकाम विभाग), वनपरिक्षेत्र अधिकारी (आवश्यकतेनुसार), पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक, सचिव : नायब तहसीलदार (महसूल)


सस्ती अदालतीत विशेष कार्यवाही

  शेतरस्ते व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा व समुपदेशन करण्यात येणार आहे.

  सामंजस्याने तडजोड करून प्रकरणांचे जलद निपटारा साधला जाणार आहे.

  प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी सस्ती अदालती घेण्यात येणार आहेत.

 अदालतीमध्ये झालेल्या कामकाजाचा पंधरवाडी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा लागणार आहे.

  उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी या कामकाजावर नियंत्रण ठेवणार आहेत.

    या सस्ती अदालतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जलद व परिणामकारक न्याय मिळवून देण्याचा मानस आहे. सर्व संबंधित नागरिक व शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार योगिता खटावकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!