अर्थसहाय्य मिळवण्यासाठी शेतकरी खातेदार यांनी e-kyc करावी - कृषी संचालक

अर्थसहाय्य मिळवण्यासाठी शेतकरी खातेदार यांनी e-kyc करावी - कृषी संचालक


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 


सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळणेसाठी शेतकरी खातेदार यांनी e-kyc करावे असे आवाहन कृषी संचालक यांनी केले आहे.

राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पहाणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य द्यावयाचे आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कापूस सोयाबीन ची नोंद आहे वनपट्टा धारक शेतकरी, ज्या गावातील भूमी अभिलेख संघनकीकरण झाले नाही, अश्या गावातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हा लाभ देण्यात येणार आहे.

सदरचे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बैंक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. या साठी सर्वसाधारण ९६ लाख खातेदार पैकी ६८ लाख खातेदार यांनी आपले आधार संमती दिली आहे. या पैकी नमो शेतकरी महासंम्मान निधी योजनेत ४६.६८ लाख आधार क्रमांक जुळले आहेत. यांची ekyc करणेची आवश्यकता नाही मात्र या व्यतिरिक्त राहिलेले २१.३८ लाख खातेदार यांनी त्यांचे आधार ekyc करणे आवश्यक आहे या पैकी २.३० लाख खातेदार यांनी दिनांक २५.९.२०२४ अखेर ekyc पूर्ण केले आहे वारीत शिल्लक १९ लाख खातेदार यांचे करिता https://scagridbt.mahait.org/ या पोर्टलवर खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

१. ज्या शेतक-यांचे ई-केवासी करावयाचे आहे, त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदरच्या शेतक-यांनी संबंधित कृषि सहाय्यकाशी संपर्क साधावा. कृषि सहाय्यक त्यांचे login मध्ये उपलब्ध सुविधेव्दारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांक वर येणाऱ्या OTP च्या माध्यमातून e-kyc करतील.

२. तसेच शेतकरी स्वतः सुद्धा या पोर्टल वर जाऊन OTP च्या माध्यमातून किंवा Biometric च्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात (CSC) जावून सुद्धा e-kyc करु शकतात. याकरिता पोर्टलच्या मुख्य पानावर Disbursement status येथे click केल्यानंतर शेतक-यांनी आपला आधार क्रमांक टाकावा. नंतर मोबाईलवर प्राप्त OTP किंवा CSC केंद्रातील Biometric मशिनच्या माध्यमातून ते e-kyc पूर्ण करु शकतात.

तरी शेतक-यांनी तात्काळ e-kyc करुन घ्यावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क साधावा.असे विनयकुमार आवटे कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळवले आहे.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!